फुटबाँल विश्वचषक जसाजसा जवळ येत चालला आहे तसातसा फुटबाँल प्रेमींचा ज्वर चढत चालाला आहे. मग यामधे भारतीय फुटबाँल संघाचा माजी कर्णाधारही भाईचुंग भुतिया मागे नाही.
नुकतेच ‘द हिंदू‘ या वृत्तपत्राने भाईचुंग भुतियाशी रशीयामधे होत असलेल्या विश्वचषकासंबधी बातचीत केली.
यावेळी बोलताना भुतीयाने आपला आवडता फुटबाँलपटू लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिना संघाला पाठींबा दर्शवीला. तसेच पुढे बोलताना तो म्हणाला की, “मी मेस्सीचा निस्सीम चाहचा आहे. यावेळी फक्त मेस्सीसाठी अर्जेंटिना जिंकावी असे मला वाटते. मेस्सी हे फुटबाँल विश्वातील मोठं नाव आहे. तो ज्यावेळी मैदानात असतो त्यावेळी संपूर्ण फुटबाँल विश्व त्याच्या खेळाकडे नजरा लाऊन बसलेलं असते.“
2014 मधे ब्राझील येथे झालेल्या विश्वचषकात अर्जेंटीनाने उपवविजेतेपद मिळवले होते.
तसेच भाईचुंग भुतियाने बोलताना त्याने पाहिलेल्या 1986 च्या पहिल्या फुटबाँल विश्वचषकाच्या आठवणींना ऊजाळा दिला. मॅराडोनाने इंग्लंड विरूध्द मारलेले ते गोल कायमस्वरूपी माझ्या स्मरणात कोरले गेले आहेत असे तो म्हणाला.
अर्जुन पुरस्कार विजेत्या भाईचुंग भुतियाने भारताकडून खेळताना 104 सामन्यात 40 गोल केले आहेत.