पुणे: 2018-2022 या कालावधीसाठी महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या(एमएसएलटीए) भरत ओझा(मुंबई) यांची अध्यक्षपदी तर सुंदर अय्यर यांची सचिवपदी बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे. एमएसएलटीएचे माजी अध्यक्ष शरद कन्नमवार यांची संघटनेच्या आजीव अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
निवडणुकीचा निकाल निवडणुक अधिकारी खुसरो श्रॉफ, निखिल संपत यांनी उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील अॅड.मोहन खटावकर यांच्या अध्यक्षतेखाली एमएसएलटीएच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुंबई येथे जाहीर करण्यात आला.
उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेक्कन जिमखानाचे सहसचिव विश्वास लोकरे(पुणे),, पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटनेचे अध्यक्ष किशोर पाटील(पुणे),, टाटा ओपन महाराष्ट्राचे स्पर्धा संचालक प्रशांत सुतार(पुणे), यांसह न्यायाधीश. अरविंद सावंत, प्रदिप जोशी(मुंबई), डॉ.दिलीप राणे(नवी मुंबई) हे प्रचंड बहुमताने निवडून आले.
नाशिकच्या राजीव देशपांडे यांची सहसचिव तर नागपुरच्या सुधीर भिवापुरकर यांची खजिनदार पदी फेरनिवड करण्यात आली.
कार्यकारिणी सभासद पदासाठीच्या निवडणुकीत अभिषेक ताम्हाणे(पुणे), शितल भोसले(कोल्हापुर), मिलिंद देशपांडे(परभणी), शिवम मोर(यवतमाळ), अली पंजवाणी(नांदेड), राजेश बेलानी(मुंबई), वर्षा स्वामी(मुंबई), राजीव देसाई(सोलापुर) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
एमएसएलटीएचे अध्यक्ष भरत ओझा म्हणाले की, संघटनेची नविन व्यवस्थापकीय समित महाराष्ट्रातील विविध भागातून निवडण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व जिल्हांमध्ये टेनिसचा विकास करतण्यात मदत मिळेल. नविन खेळाडू तयार होऊन टेनिस खेळाला एक नविन उंची मिळेल.
एमएसएलटीएचे मानद सचिव व एआयटीए कार्यकारिणी समिती सदस्य सुंदर अय्यर म्हणाले की, संघटना अधिकाधिक सक्षम करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. टेनिसच्या होत असलेल्या विकासाबबत आम्ही समाधानी आहोत. भारतात होत असलेल्या सर्वाधीक स्पर्धांचे यशस्वी आयोजन संघटनेने केले आहे. आपल्या खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरवशाली कामगिरी केली आहे. आम्हाला खात्री आहे की, टेनिस खेळ महाराष्ट्रातील छोट्यातल्या छोट्या गावापर्यंत परवडेल अशा पध्दतीने पोहोचेल.
2018-2022 वर्षासाठी नवीन व्यवस्थापकीय समिती खालीलप्रमाणे-
आजीव अध्यक्ष- घनश्याम पटेल(मुंबई),शरद कन्नमवार(मुंबई),
आजीव उपाध्यक्ष- आनंद तुळपुळे(पुणे), मोहन वर्दे(मुंबई)
अध्यक्ष- भरत ओझा(मुंबई)
मानद सचिव- सुंदर अय्यर(पुणे)
सहसचिव- राजीव देशपांडे(नाशिक)
खजिनदार- सुधीर भिवापुरकर(नागपुर)
उपाध्यक्ष- न्यायाधीश. अरविंद सावंत(मुंबई), प्रदीप जोशी(मुंबई), किशोर पाटील(पुणे), विश्वास लोकरे(पुणे), प्रशांत सुतार(पुणे), डॉ.दिलीप राणे(नवी मुंबई)
कार्यकारिणी सभासद- अभिषेक ताम्हाणे(पुणे), शितल भोसले(कोल्हापुर), मिलिंद देशपांडे(परभणी), शिवम मोर(यवतमाळ), अली पंजवाणी(नांदेड), राजेश बेलानी(मुंबई), वर्षा स्वामी(मुंबई), राजीव देसाई(सोलापुर)