fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

भारत पेट्रोलियम, महिंद्रा अँड महिंद्रा, एयर इंडिया संघाची शिवनेरी कबड्डी स्पर्धेत विजयी सुरुवात

शिवनेरी सेवा मंडळ, दादर आयोजित कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी(30 सप्टेंबर) विशेष व्यवसायिक आणि महिला गटांच्या स्पर्धेला सुरुवात झाली. विशेष व्यवसायीक गटात प्रो कबड्डीतील काशीलिंग आडके, नितीन मदने, निलेश शिंदे, रोहित राणा, नितीन मोरे यांसारख्या काही स्टार खेळाडूंचा खेळ बघायला मिळाला.

व्यवसायीक ‘अ’ गटात भारत पेट्रोलियम विरुद्ध मुंबई महानगरपालिका यांच्यात झालेल्या सामन्यांत भारत पेट्रोलियम संघाने ३६-१३ असा एकहाती विजय मिळवला. काशीलिंग आडके, नितीन मोरे यांनी चढाईत चांगला खेळ केला. तर ओमकार मोरे व निलेश शिंदे यांनी पकडीत चांगला खेळ केला.

तर ‘ब’ गटात महिंद्रा अँड महिंद्रा विरुद्ध जिजाऊ यांच्यात झालेल्या सामन्यांत मध्यंतरापर्यंत चांगली लढत बघायला मिळाली. महिंद्राकडे मध्यंतरापर्यंत १९-१८ अशी नाममात्र १ गुणांची आघाडी होती. मध्यंतरानंतर महिंद्राने आपला खेळ उंचावत आघाडी भक्कम करत ३७-२८ असा विजय मिळवला.

‘इ’ गटात सेंट्रल रेल्वेने न्यू इंडिया इन्शुरन्सचा ३०-२१ असा पराभव केला. ‘ड’ गटात एयर इंडियाने ३८-१९ असा मुंबई पोलीस संघावर विजय मिळवला.

महिला गटांत झालेल्या पहिल्या सामन्यांत सिद्धी स्पोर्ट्स क्लबने प्रता स्पोर्ट्स क्लबवर ३६-३० असा विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला. तर ओम कबड्डी संघाने चंद्रोदय क्रीडा मंडळाचा ४०-३२ असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश मिळवला.

महाविद्यालयीन गटात आंध्र इ. सोसायटी कॉलेजचा केएम पटेल कॉलेजने ४५-१५ असा एकतर्फी पराभव केला. विवा कॉलेज विरारने ४१-१७ असा एसएसटी कॉलेजवर विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

शिवनेरी सेवा मंडळ कबड्डी स्पर्धेत आर. बी. आय. व सचिवालय जिमखाना यांची विजयी सलामी

दबंग दिल्लीच्या नवीन एक्सप्रेसला मेगाब्लॉक नाही…

You might also like