---Advertisement---

सचिनप्रमाणेच विराटलाही भारतरत्न द्या, पहा कुणी केली मागणी

---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने सोमवारी (5 नोव्हेंबर) 30 वा वाढदिवस साजरा केला आहे. त्यानिमित्त आॅल इंडिया गेमिंग फेडरेशनने(एआयजीफ) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून विराटला देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार ‘भारतरत्न’ देण्याची विनंती केली आहे.

पत्रात त्यांनी म्हटले आहे की ‘क्रिकेट हा आपल्या देशातील सर्वात आवडीचा खेळ आहे आणि विराटने मागील काही वर्षापासून त्याच्या अफलातून कामगिरीने अनेक चाहत्यांची मने जिंकली आहेत.’

‘त्यामुळे आॅल इंडिया गेमिंग फेडरेशनला (एआयजीफ) विश्वास आहे की क्रिकट या जागतिक पातळीवर खेळल्या जाणाऱ्या खेळात भारताचा स्तर आणि छबी उंचवण्यात विराटचे योगदान आहे. यासाठी त्याचा भारतरत्न देऊन सन्मान करण्यात यावा.”

“विराटला भारताच्या सर्वोच्च नागरिक पुरस्काराने सन्मानित करणे म्हणजे कौशल्य, योग्यता आणि कष्ट यांचा सन्मान करण्यासारखे आहे.

याआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला भारतरत्न देण्यात आला आहे. भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित होणारा सचिन एकमेव खेळाडू आहे.

विराटची मागील काही वर्षांपासून उत्कृष्ट कामगिरी होत आहे. त्याने नुकतेच वनडेमध्ये सर्वात जलद 10 हजार धावा करण्याचा विश्वविक्रम केला आहे. तसेच त्याची वनडे आणि कसोटीमध्ये 50 पेक्षा अधिक फलंदाजी सरासरी आहे.

तो सध्या आयसीसी क्रमवारीतही कसोटी आणि वनडेमध्ये फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत 351 सामन्यात 56.56 च्या सरासरीने 18665 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 62 शतके आणि 85 अर्धशतकांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

आज होत असलेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात या ५ विक्रमांकडे नक्की लक्ष ठेवा

या कारणामुळे आजचा दिवस रोहित शर्माच्या कारकिर्दीत सुवर्णाक्षरांनी लिहीला जाणार

२०००सालापुर्वी आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेले ६ खेळाडू आजही खेळतात क्रिकेट

५ वर्षांपुर्वी हाच दिवस होता सचिन- रोहितसाठी कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा क्षण

आणि त्याने वयाच्या ४१व्या वर्षी घेतली कसोटी क्रिकेटमध्ये विकेट

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment