fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

५ वर्षांपुर्वी हाच दिवस होता सचिन- रोहितसाठी कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा क्षण

बरोबर ५ वर्षांपुर्वी अर्थात ११ नोव्हेंबर २०१३ रोजी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आपला १९९ वा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. तर याच दिवशी रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीने भारताकडून तर शेल्डन काॅर्टेलने विंडीजकडून कसोटी पदार्पण केले होते.

भारत विरुद्ध विंडीज दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत कोलकाता येथे हा पहिला कसोटी सामना झाला होता

तब्बल १०८वनडे सामने खेळल्यानंतर ७ वर्षांनी रोहित शर्माला क्रिकेटचा हा प्रकार खेळण्याची संधी मिळाली होती.

या सामन्यात रोहितने पहिल्या डावात ३०१ चेंडूत १७७ धावांची धमाकेदार खेळी केली होती तर दुसऱ्या डावात भारताला फलंदाजी मिळाली नव्हती.

मोहम्मद शमीने पहिल्या डावात ४ तर दुसऱ्या डावात ५ अशा एकूण ९ विकेट्स घेतल्या होत्या.

सचिनने या सामन्यात पहिल्या डावात १० धावा केल्या होत्या. त्यानंतर मुंबई येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत तसेच कारकिर्दीतील २००व्या कसोटी सामन्यात सचिन निवृत्त झाला.

दोन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत २८८ धावा करणारा रोहित शर्मा मालिकावीर ठरला होता.

त्या कसोटी सामन्यात पदार्पण करणाऱ्या तीनही खेळाडूंची कसोटी कारकिर्द- 

त्या दिवसानंतर बरोबर ५ वर्षात टीम इंडिया ५७ कसोटी सामने खेळली. यात रोहित शर्माला २५ सामन्यात संधी देण्यात आली. त्याने या २५ सामन्यात ३९.९७च्या सरासरीने १४७९ धावा केल्या.

मोहम्मद शमीला ३६ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. त्यात त्याने  २९.९६च्या सरासरीने १२८ विकेट्स घेतल्या.

तर विंडीजचा खेळाडू शेल्डन काॅर्टेलला केवळ दोन कसोटी सामने कारकिर्दीत खेळण्याची संधी मिळाली. त्यात त्याने ११ धावा आणि २ विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या:

आणि त्याने वयाच्या ४१व्या वर्षी घेतली कसोटी क्रिकेटमध्ये विकेट

कसोटी क्रिकेटमध्ये आज इतिहास घडला, रंगना हेराथचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार

पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकात खेळण्याचा अजिंक्य रहाणेने व्यक्त केला विश्वास

धोनी, विराटलाही जे जमले नाही ते रोहित शर्माला करण्याची संधी

एकही चेंडू न टाकता विराटने घेतली होती पहिली टी20 विकेट

बर्थडेच्या दिवशीच पाकिस्तानच्या खेळाडूने मोडला विराटचा विक्रम

 

 

You might also like