---Advertisement---

डी.ई.एस. फर्ग्युसन कॉलेज एआयटीए चॅम्पियनशीप सिरीज: अनुष घनबहादूर, रुद्रसेन शिंदे, स्वर्णिम येवलेकर, अर्जुन परदेशी यांची आगेकूच

On: शनिवार, मे 21, 2022 4:26 PM
Anush-Ghanbahadur
---Advertisement---

पुणे। फर्ग्युसन कॉलेज आणि नंदन बाळ टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या डी.ई.एस. फर्ग्युसन कॉलेज एआयटीए चॅम्पियनशीप सिरीज 16वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत मुलांच्या गटात अनुष घनबहादूर, रुद्रसेन शिंदे, स्वर्णिम येवलेकर, अर्जुन परदेशी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली.

फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात अनुष घनबहादूर व रुद्रसेन शिंदे यांनी अनुक्रमे अथर्व जोशी व सिद्धांत थोरवे यांचा 9-3 अशा सारख्याच फरकाने पराभव केला. स्वर्णिम येवलेकरने अर्णव चावलाचा 9-5 असा तर, अर्जुन परदेशी याने अरमान मुलचंदानीचा 9-1 असा पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली पात्रता फेरी: मुले:
अनुष घनबहादूर वि.वि.अथर्व जोशी 9-3;
मिहीर कांतावाला वि.वि.जहान सिद्दीकी 9-5;
आर्य कुचीभाटिया वि.वि.रौनक ललवानी 9-4;
अर्जुन परदेशी वि.वि.अरमान मुलचंदानी 9-1;
आदित्य भटवेरा वि.वि.राघव सरोदे 9-6;
आरुष जोशी वि.वि.रोनित नागोरी 9-4;
अनन्मय उपाध्याय वि.वि.प्रत्युश बगाडे 9-2;
शान वरळीकर वि.वि.रोहन बजाज 9-3;
रुद्रसेन शिंदे वि.वि.सिद्धांत थोरवे 9-3;
स्वर्णिम येवलेकर वि.वि. अर्णव चावला 9-5.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘ज्याच्या पार्टीत जास्त मजा येईल’, चाहत्याने विचारलेल्या ‘त्या’ प्रश्नावर शास्त्रींचे भन्नाट उत्तर

अखेर दिल्लीविरुद्ध अर्जुन तेंडूलकरचे होणार आयपीएल पदार्पण? अजून कोणी नव्हे जडेजानेच केलाय दावा

प्लेऑफमध्ये दिमाखात एंट्री केल्यानंतर काय म्हणाला राजस्थानचा ‘रॉयल’ कर्णधार संजू सॅमसन?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---