निवृत्त खेळाडूंच्या लिजेंड्स लीग क्रिकेट 2022 मधील दुसरा सामना भिलवाडा किंग्स विरुद्ध मणिपाल टायगर्स यांच्या दरम्यान खेळला गेला. अखेरच्या षटकापर्यंत ताणल्या गेलेल्या या सामन्यात अखेर भिलवाडाने 3 गड्यांनी विजय संपादन करून स्पर्धेची सुरुवात विजयाने केली.
Congratulations to @Bhilwarakings who open with their account with a Win. Manipal Tigers put up a great show but ultimately fell short. #LLCT20 #LegendsLeagueCricket #BossLogoKaGame
— Legends League Cricket (@llct20) September 18, 2022
भिलवाडा किंग्सचा कर्णधार इरफान पठाण याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा हा निर्णय योग्य ठरला. त्याने पहिल्याच षटकात पहिला बळी मिळवला. फिडेल एडवर्डसने तीन बळी मिळवत मणिपाल संघाची अवस्था 4 बाद 15 अशी केली. एका बाजूने गडी बात होत असताना मोहम्मद कैफने एक बाजू लावून धरत संघाला सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने नेले. तैबू, प्रदीप साहू व शुक्ला यांनी उपयुक्त योगदान दिल्याने संघाला 150 धावांची मजल मारता आली. कैफने 59 चेंडूवर 73 धावांची आकर्षक खेळी केली. भिलवाडा किंग्ससाठी एडवर्डसने सर्वाधिक चार बळी आपल्या नावे केले.
विजयासाठी मिळालेल्या 154 धावांचा पाठलाग करताना, नमन ओझा व विल्यम पोर्टरफिल्ड झटपट बाद झाले. मात्र, कॉम्टन व तन्मय श्रीवास्तव यांनी छोट्या मात्र उपयुक्त खेळ्या करत अडचणीतून बाहेर काढले. ते बाद झाल्यानंतर युसुफ पठाणने डावाची सूत्रे आपल्याकडे घेत संघाला विजयाच्या दिशेने नेले. दरम्यान इरफान पठाण व राजेश बिश्नोई यांनी अनुक्रमे 15 व 13 धावा केल्या. अखेरच्या दोन षटकात 23 धावांची गरज असताना युसुफने एक चौकार व एक षटकार ठोकत लक्ष आवाक्यात आणले. मात्र, पुढच्या चेंडूवर तो बाद झाला. पुढील तीन चेंडूत एकच धाव आल्याने सामना अंतिम षटकात गेला. अखेरचा षटकात टीनो बेस्टने एक षटकार आणि दोन चौकार ठोकत संघाला दोन चेंडू राखून विजय मिळवून दिला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बेंगळुरू एफसी बनले ड्यूरंड कपचे चॅम्पियन! कोस्टाचा विनर मुंबईवर भारी
अखेर टीम इंडियाच्या नव्या जर्सीचे झाले अनावरण! पाहा लूक आणि इतर खासियत
जेव्हा झुलन गोस्वामीच्या इनस्विंगने रोहित शर्माचाही केला होता बट्ट्याबोळ