फुटबॉलचे चाहते जगभरात मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच युरोपिय फुटबॉल क्लब्सच्या चाहत्यांची संख्या अधिक आहे. अशा या फुटबॉलमय जगातील इंग्लिश प्रीमियर लीग (पीएल) ही प्रसिद्ध लीगपैकी एक आहे. या लीगमध्ये बुधवारी (4 जानेवारी)एक इतिहास घडला.भूपिंदर सिंग गिल हे बुधवारी साऊथम्प्टन विरुद्ध नॉटम फॉरेस्ट (Nottm Forest) या पीएलच्या सामन्यांमध्ये असिस्टंट रेफरीच्या भुमिकेत दिसले. ते ही जबाबदारी पार पाडणारे पहिले शीख-पंजाबी ठरले आहेत.
भूपिंदर सिंग गिल ( Bhupinder Singh Gill) 37 वर्षाचे असून त्यांचे कुटुंबही फुटबॉलचे चाहते आहेत. त्यांचे वडील जर्नेल सिंग यांनी देखील 2004 ते 2010 दरम्यान 150 पेक्षा अधिक सामन्यांमध्ये रेफरी म्हणून काम पाहिले आहे. त्यांचे भाऊ सनी यानेदेखील या हंगामाच्या सुरूवातीला एक ऐतिहासिक विक्रम रचला होता. ते नॉर्थम्प्टन आणि हार्टलेपूल या लीग टू सामन्याचे रेफरी होते. ते त्यांच्या वडिलांनतर पहिले ब्रिटिश- दक्षिण आशियाई रेफरी ठरले.
सामन्यानंतर भूपिंदर म्हणाले, “आतापर्यंतचा माझा प्रवास रोमांचक राहिला. माझ्या कुटुंबालाही माझ्यावर गर्व असून मी एवढ्यावरच थांबणार नाही. माझ्या सामन्यासाठी वडील, माझी बायको आणि मुलगा आले होते. तसेच यासाठी वडीलांनी सुट्टी घेतली होती. अशा क्षणावेळी कुटुंब जवळ असले तर उत्साह आणखी वाढतो. ”
इंग्लंडमध्ये रेफरी असताना अनेकांनी भुपिंदर यांच्या कामाचे कौतुक केले आहे. इंग्लिश फुटबॉल रेफरीचे अध्यक्ष हावर्ड वेब यांनी भूपिंदरला रेफरी झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे आणि तो त्याच्या वडिलांप्रमाणे खेळ समजू शकेल आणि योग्य निर्णय देईल, अशी आशा व्यक्त केली आहे. वेब हे मेजर सॉकर लीग आणि 2010च्या फिफा विश्वचषकाचेही भाग राहिले आहेत.
भूपिंदर यांनी वयाच्या 14व्या वर्षीच रेफरीसाठीची पहिली परिक्षा पास केली होती. ते फिजिकल एज्युकेशनचे शिक्षकही होते.
First Sikh-Punjabi to serve as an assistant referee at a Premier League match ❤️
Congratulations, @BhupsGill_ARef ???? pic.twitter.com/bxD13QaRFU
— Premier League India (@PLforIndia) January 5, 2023
साऊथम्प्टन विरुद्ध नॉटम फॉरेस्ट हा सामना फॉरेस्टने 1-0 असा जिंकला.
(Bhupinder Singh Gill, Premier League’s first Sikh assistant referee)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शर्यत अजून संपलेली नाही! तीन वर्षांनी पुनरागमन करत केदारची वादळी 283 धावांची खेळी; महाराष्ट्र…
सॅम करनला विमान कंपनीने अचानक दिला दगा, ‘या’ कारणास्तव विमानात नाही मिळाली जागा






