---Advertisement---

सॅम करनला विमान कंपनीने अचानक दिला दगा, ‘या’ कारणास्तव विमानात नाही मिळाली जागा

On: गुरूवार, जानेवारी 5, 2023 3:37 PM
sam curran
---Advertisement---

मागच्या महिन्यात आयपीएल 2023 साठी पार पडलेल्या लिलावात काही खेळाडूंवर कोट्यावधी रुपयांची बोली लागली. इंग्लंडचा युवा अष्टपैलू सॅम करन याला पंजाब किंग्जे तब्बल 18.50 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. ही आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी बोली ठरली, ज्यामुळे सॅम करन चांगलाच चर्चेत आला आहे. आता करन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, पण यावेळी कारण अनोखे आहे. एअरलाईन कंपनीने त्यांच्या विमानात बसवण्यास नकार दिला आहे. ही बातमी करनच्या चाहत्यांसाठी धक्कादायक असली, तरी यामागचे कारण जाणून घेणेही तितकेच महत्वाचे आहे.

सॅम करन (Sam Curran) याने स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून पोस्ट करत या विमान वाहतूक कंपनीविषयी नाराजी व्यक्त केली आहे. करनने या ट्वीटमध्ये तो विमानाने कुठे निघाला होता, हे सांगितले नाही, पण विमान कंपनीच्या नावाचा उल्लेख मात्र केला आहे. विमान कंपनीने दिलेल्या माहितीनुसार सॅम करनने जे सीट बूक केले आहे, ते टुटल्यामुळे त्याला विमानात बसू दिले गेले नाही. कंपनीने विमानात प्रवेश दिला नाही म्हणून करनने ट्वीट केले की, “वर्जिन एटलांटिक (Virgin Atlantic) एअरलाइंसची विमान पकडायचे होते. पण एअरलाईन कंपनीने मला सांगितले की, विमानातील जे सीट मी बूक केले होते, ते टुटले. त्यामुळेच मला प्रवास करू दिला गेला नाही. हे खरोखर हैराण करणारे आणि लाजीरवाणे आहे.”

सॅम करनने विमान वाहतूक कंपनीविषयी नाराजी व्यक्त केल्यानंतर कंपनीने देखील या ट्वीटची दखल घेतली. वर्जिन एटलांटिक कंपनीने करनच्या ट्वीटला उत्तर देत लिहिले की, “नमस्ते सॅम, मला हे ऐकवे लागल्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो. जर तू हेल्प डेस्कवर आमच्या टीमसोबत याविषयी चर्चा केली, तर त्यांना तुझ्यासाठी पर्यायी विमानाचे नियोजन करताना खूप आनंद होईल. तू आमच्या कस्टमर केअर टीमला देखील प्रतिक्रिया कळवू शकतोस.”

दरम्यान, सॅम करून इंग्लंड संघासाठी मागच्या वर्षी महत्वाचा खेळाडू ठरला. इंग्लंडला टी-20 विश्वचषकात विजेतेपद मिळवून देण्यासाठीही करनची भूमिका सर्वात महत्वाची राहिला. विश्वचषक स्पर्धेत सॅम करन मालिकावीर ठरला होता. त्याचा चाहतावर्ग मोठा आहे आणि तरीदेखील त्याला विमान प्रवासाला नकार दिल्यामुळे हा मुद्दा चर्चेचा विषय ठरत आहे. करनने देखील विमान कंपन्यांच्या सुमार कारभार दाखवण्याचा प्रयत्न या ट्वीटमधून केला आहे. (The airline denied Sam Curran entry to the flight)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---