भारतात सध्या क्रिकेटचे वारे पुन्हा वाहू लागले आहेत. भारत आणि इंग्लंड संघात सध्या ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. याबरोबरच २० फेब्रुवारीपासून विजय हजारे ट्रॉफी या वनडे स्पर्धेला सुरुवात होणार आहे. याआधी काहीदिवसांपूर्वीच सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धा पार पडली होती. या स्पर्धेत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या उत्तरप्रदेश क्रिकेट संघाने विजय हजारे ट्रॉफीसाठी संघात महत्वाचे बदल केले आहेत.
सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत उत्तरप्रदेश संघाचे नेतृत्व युवा क्रिकेटपटू प्रियम गर्गने केले होते. पण, विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याला कर्णधार पदावरून काढण्यात आले आहे. त्याच्या जागी भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच संघातील वरिष्ठ खेळाडू सुरेश रैनाला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या जलद गोलंदाज भुवनेश्वर कुमारला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधून पुन्हा एकदा मैदानात परतण्याची संधी मिळाली होती. तसेच तो नॅशनल क्रिकेट अकॅडमीच्या फिटनेस चाचणीमध्ये उत्तीर्ण झाला आहे. भुवनेश्वर कुमार संघात परतल्याने उत्तर प्रदेश संघाला फायदा होईल. तसेच युवा खेळाडूंनाही त्याच्या अनुभवाचा देखील फायदा होऊ शकतो.
सुरेश रैना याची निराशाजनक कामगिरी
मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या सुरेश रैनाचे प्रदर्शन सैय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत निराशाजनक होते. त्याने ५ सामन्यात केवळ १०४ धावा केल्या होत्या
विजय हजारे ट्रॉफी साठी उत्तर प्रदेश संघ
भुवनेश्वर कुमार (कर्णधार), कर्ण शर्मा, प्रियम गर्ग, अलमास शौकत, उपेंद्र यादव, आर्यन जुयाल, कार्तिक त्यागी, शिवम मावी, मोहसिन खान, अक्षदीप नाथ, रिंकू सिंग, समीर चौधरी, माधव कौशिक, अभिषेक गोस्वामी, समर्थ सिंह, आकिब खान, शानू सैनी, पूर्णांक त्यागी, योगेंद्र डोयला, जसमेर धनकर, मुनिंदर मौर्या, शिवम शर्मा
महत्त्वाच्या बातम्या –
चेन्नईच्या खेळपट्टीवर होऊ शकतो काळया मातीचा वापर; संघांना होणार ‘हा’ फायदा
पोरांची आयपीएल! तीन दिग्गज माजी क्रिकेटपटूंची पोरं उतरणार आयपीएल लिलावात, पाहा कोण आहेत ते चेहरे
IND Vs ENG : एक शतक अन् पाँटिंगला पछाडत कोहलीच्या नावावर होणार ‘वर्ल्डरिकॉर्ड’