पंजाब किंग्जचा प्रभारी कर्णधार शिखर धवन संघाला आयपीएल २०२२ मधील २८वा सामना जिंकून देऊन शकला नाही. सनरायझर्स हैदराबादने ७ विकेट्स राखून हा सामना जिंकला. या सामन्यात धवनला दुहेरी धक्का बसला. एक म्हणजे त्याने आपल्या नेतृत्त्वाखाली पहिलाच सामना गमावला. दुसरे म्हणजे, या सामन्यादरम्यान त्याला दुखापतही झाली आहे. फलंदाजी करतेवेळी धवनच्या प्रायव्हेट पार्टला चेंडू लागला आहे.
धवनने (Shikhar Dhawan) या सामन्यात ११ चेंडूंमध्ये १ चौकारांच्या मदतीने ८ धावा केल्या. या खेळीदरम्यान हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारचा (Bhuvneshwar Kumar) एक चेंडू त्याच्या प्रायव्हेट पार्टला (Ball Hit Dhawan’s Private Part) लागला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
भुवनेश्वर पंजाबच्या डावातील पहिले षटक टाकण्यासाठी आला होता. त्याच्या षटकातील तिसरा चेंडू धवनने थोडा पुढे येऊन मारला आणि चौकारासाठी सीमारेषेपार गेला. त्यानंतर पुन्हा धवनने चौथ्या चेंडूवर असाच फटका मारण्याचा प्रयत्न केला. तो पुन्हा पुढे येऊन फटका खेळण्याच्या प्रयत्नात होता. परंतु तो भुवनेश्वरचा बॅक ऑफ लेंथ चेंडूला ऑन साइडवर मारण्याच्या प्रयत्नात असताना तो चेंडू सरळ धवनच्या प्रायव्हेट पार्टला जाऊन लागला. त्यानंतर धवन वेदनेने मैदानावर विव्हळताना दिसला.
OUCH!
Dhawan gets hit on the box and needs some assistance. Hope he's fine 🤞#SaddaPunjab #IPL2022 #PunjabKings #PBKSvSRH #ਸਾਡਾਪੰਜਾਬ
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 17, 2022
धवनला हा चेंडू इतक्या जोराने लागला होता की, तो काही मिनिटांसाठी मैदानावर वेदनेने विव्हळत होता. त्यानंतर पंजाब संघाचे फिजिओ मैदानावर आले आणि त्यांनी धवनवर उपचार केले. त्यानंतर धवन पुन्हा फलंदाजीसाठी तयार झाला. परंतु भुवनेश्वरच्या डावातील तिसऱ्या षटकात विकेट गमावून बसला.
Shikhar Dhawan Wicket VIDEOhttps://t.co/lKnc0aLzdk
— Shilpi sharma (@Itsshilpisharma) April 17, 2022
मयंक अगरवाल संघाबाहेर बसण्यामागचे कारण
या सामन्यात पंजाबचा नियमित कर्णधार मयंक अगरवाल खेळला नाही. त्याच्या पायाच्या बोटाला लागल्याने तो या सामन्याला मुकला आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी शिखर धवन पंजाबचे प्रभारी कर्णधारपद सांभाळेल. शिखरने मयंकबद्दल सांगितले आहे की, तो पुढच्या सामन्यापर्यंत बरा होईल. तसेच मयंक ऐवजी अंतिम ११ जणांच्या संघात प्रबसिमरन याला संधी देण्यात आली आहे.
पंजाबने ७ विकेट्सने गमावला सामना
या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली होती. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांमध्ये १५१ धावा केल्या होत्या. हैदराबादने १८.५ षटकांमध्येच ३ विकेट्सच्या नुकसानावर पंजाबचे लक्ष्य गाठले होते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
सचिन तेंडूलकरनंतर आयपीएलमधील ‘या’ भारी विक्रमावर फक्त ऋतुचा ‘राज’, ठरला दुसराच भारतीय
शेवटच्या क्षणी विलियम्सनने घेतला डीआरएस, चिडलेल्या पंजाबच्या फलंदाजाची पंचाकडे धाव; पुढे घडलं भलतंच