सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर रविवारी (१७ एप्रिल) झाला. सनरायझर्स हैदराबादने ७ विकेट्स राखून हा सामना जिंकला. हा त्यांचा हंगामातील चौथा विजय होता. विशेष म्हणजे, पुन्हा एकदा हैदराबादने विजयी षटकार खेचत सामना आपल्या खिशात घातला आहे.
सुरुवातीचे सलग २ सामने गमावलेल्या हैदराबादने (Sunrisers Hyderabad) आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये दिमाखात पुनरागमन केले आहे. पंजाबने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटकामध्ये १५१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात हैदराबादने १८.५ षटकातच ३ विकेट्सच्या नुकसानावर पंजाबचे लक्ष्य गाठले. हैदराबादकडून वैभव अरोराच्या डावातील १९व्या षटकातील पाचव्या चेंडूवर ऍडम मार्करमने (Aiden Markram) खणखणीत षटकार मारत संघाला सामना जिंकून दिला आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वीही दोन्ही सामनेही हैदराबादने षटकारासह संपवले (Match Finishes With Six) आहेत. कोलकाता नाईट रायडर्सच्या १७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मार्करमने १७.५ षटकावर षटकार मारत संघाला ७ विकेट्सने सामना जिंकून दिला होता. तसेच त्यापूर्वीच्या गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यातही निकोलस पूरनने षटकारासह संघाला विजय मिळवून दिला होता. हैदराबादने ८ विकेट्स राखून तो सामना जिंकला होता.
AIDEN FINISHES OFF IN STYLE AGAIN! THE #RISERS WIN! ???????????? #PBKSvSRH #OrangeArmy #ReadyToRise #TATAIPL
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 17, 2022
याखेरीज हैदराबादने आयपीएल २०२२ मधील त्यांचे चारही सामने आव्हानाचा पाठलाग करताना जिंकले आहेत.
सनरायझर्स हैदराबादचे शेवटचे ४ विजय (आव्हानाचा पाठलाग करताना):
पंजाब किंग्ज विरुद्ध – ७ विकेट्स राखून विजयी
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध – ७ विकेट्स राखून विजयी
गुजरात टायटन्स विरुद्ध – ८ विकेट्स राखून विजयी
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध – ८ विकेट्स राखून विजय
That's that from Match 28.
Aiden Markram finishes off things in style as @SunRisers win by 7 wickets.#TATAIPL #PBKSvSRH pic.twitter.com/njYoptmhFw
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2022
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, हैदराबादकडून फलंदाजी करताना एडम मार्करमने सर्वाधिक धावा चोपल्या. त्याने २७ चेंडूंचा सामना करताना १ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने नाबाद ४१ धावा केल्या. त्याच्यासोबतच निकोलस पूरननेही नाबाद राहत ३० चेंडूत ३५ धावा चोपल्या. यामध्ये १ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. या दोघांव्यतिरिक्त राहुल त्रिपाठीने ३४, तर अभिषेक शर्माने ३१ धावांचे योगदान दिले.
यावेळी पंजाबकडून गोलंदाजी करताना राहुल चाहरने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना २८ धावा देत २ विकेट्स आपल्या नावावर केल्या. तसेच, कागिसो रबाडानेही १ विकेट घेतली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना पंजाबकडून लियाम लिविंगस्टोनने सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने ३३ चेंडूत ४ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ६० धावा चोपल्या. त्याच्याव्यतिरिक्त एकट्या शाहरुख खानलाच २६ धावा करता आल्या. बाकीच्या कोणत्याही खेळाडूला २० धावांचा आकडा पार करता आला नाही. हैदराबादकडून गोलंदाजी करताना उमरान मलिकने कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना २८ धावा देत ४ विकेट्स घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
मयंकच्या अनुपस्थितीत पंजाबचा गेला तोल, हैदराबादने ७ विकेट्सने चारली धूळ; उमरान मलिक ठरला हिरो
अरेरे! दिग्गज क्रिकेटरने हटवला रैनाचा ‘मिस्टर आयपीएल’चा टॅग, ‘या’ धाकड फलंदाजाला म्हटले हक्कदार