क्रिकेटमध्ये गोलंदाजाने नो बॉल टाकल्यास मोठा गुन्हा ठरतो. कारण, या नो बॉलवर फलंदाज बाद झाल्यास त्याला बाद दिले जात नाही. तसेच, पुढील चेंडूवर फ्री-हीट मिळून फलंदाज मोठा फटका खेळण्यासाठी तयार असतो. कारण, त्या चेंडूवर धावबाद व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने फलंदाज बाद होत नाही. परंतु, भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने तब्बल सहा वर्षानंतर नो बॉल टाकला. ज्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याचे कौतुक करण्यास सुरुवात केली आहे.
भुवनेश्वर कुमारने टाकला नो बॉल
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यातील पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर भुवनेश्वर कुमारने नो बॉल टाकला. फ्री-हीटवर श्रीलंकेचा फलंदाज मिनोद भानुका एकही धाव घेऊ शकला नाही.
भुवनेश्वर कुमारने हा नो बॉल टाकल्यानंतर ट्विटर वर चाहत्यांनी त्याचे कौतुक करण्यास सुरुवात केली. कारण, भुवनेश्वर कुमारने ऑक्टोबर २०१५ नंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नो बॉल टाकला आहे. त्याने ५१५ षटके आणि ३०९३ चेंडूनंतर नो बॉल टाकला. यावर एका चाहत्याने प्रतिक्रिया देताना म्हटले, ‘३०९३ चेंडू विना पुढे पाऊल टाकता. शेवटी भुवनेश्वरने नो बॉल टाकलाच.’
https://twitter.com/12Geofinn/status/1417422497922707456
आणखी एका ट्विटर वापरकर्त्याने लिहिले, ‘भुवनेश्वरने यापूर्वी नो बॉल टाकला होता का?’
https://twitter.com/vamsikrishna717/status/1417421981092245504
तसेच अनेकांनी त्याच्या आकडेवारीचा दाखला देत त्याचे कौतुक केले.
https://twitter.com/shwetha0811/status/1417428020252471298
https://twitter.com/Gowtham0410/status/1417422963167490049
First no ball from Bhuvi since October 2015 ???? oh my my
— ???? (@_cummo) July 20, 2021
दुसऱ्या सामन्यात भुवनेश्वरची शानदार गोलंदाजी
दुखापतीमुळे आयपीएल २०२१ ला मुकलेल्या भुवनेश्वर कुमारने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यातून पुनरागमन केले. या मालिकेसाठी तो संघाचा उपकर्णधार आहे. पहिल्या सामन्यात त्याला एकही बळी मिळाला नव्हता. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्याने आपल्या १० षटकांत ५.४० इकॉनॉमी रेटने ५४ धावा देत ३ गडी बाद केले.






