सध्या भारत आणि इंग्लंडमध्ये ३ टी२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. पहिल्या टी२० सामन्यात हार्दिक पंड्याच्या अर्धशतकाच्या व गोलंदाजीत मिळवलेल्या ४ बळींच्या मदतीने भारताने इंग्लंडला धूळ चारली. मात्र, पंड्याच्या या दिमाखदार कामगिरीनंतर ही सर्वाधिक चर्चा झाली ती गोष्ट म्हणजे भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलरची.
झाले असे की, १९८ धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर बटलर मैदानावर फलंदाजीसाठी आला. पण भुवनेश्वर कुमारने त्याला टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर तो त्रिफळाचित बाद झाला. मात्र, भुवनेश्वरच्या पहिल्याच चेंडूवर बाद होणे त्याच्यासाठी काही नवीन नाही. यापुर्वी मागील वर्षी भारतातील अहमदाबाद येथे झालेल्या टी२० सामन्यातही तो भुवनेश्वरच्या पहिल्या चेंडूवर बाद झाला होता. फरक मात्र एवढाच की त्यावेळी तो पायचीत बाद झालेला.
(ही बातमी ६० शब्दांमध्ये आहे. इतर सविस्तर बातम्या वाचण्यासाठी mahasports.in वर जा)