---Advertisement---

भारताचा ‘हा’ गोलंदाज अँडरसनच्या बरोबरीचा, तरीही त्याला इंग्लंडला का नेलं नाही?

On: शुक्रवार, जुलै 2, 2021 2:02 PM
---Advertisement---

भारतीय वेगवान गोलंदाजांनी मागील काही वर्षापासून अप्रतिम कामगिरी करत दैदिप्यमान यश मिळवले आहे. जगभरातील अनेक समीक्षक देखील भारताच्या वेगवान गोलंदाजांचे चाहते झाले आहेत. भारताच्या गोलंदाजांवर जगातील प्रत्येक मैदानावर चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे. मात्र, नुकत्याच संपलेल्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताचे वेगवान गोलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाहीत.

इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हे भारताचे तिन्ही वेगवान गोलंदाज प्रभावी ठरले नाहीत. या अंतिम सामन्याच्या दोन्ही डावात बुमराहला बळी मिळविण्यात अपयश आले. शमी आणि इशांत पहिल्या डावात यशस्वी ठरले. मात्र, दुसऱ्या डावात या दोघांनाही चांगली कामगिरी करता आली नाही. भारतीय गोलंदाजांच्या या निराशाजनक कामगिरीनंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट याने प्रतिक्रिया देताना, भारतीय संघाच्या गोलंदाज निवडीवर प्रश्नचिन्ह उभे केले.

‘हा’ गोलंदाज अँडरसनच्या तोडीचा
भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यात भारतीय गोलंदाजांचे अपयश ठळकपणे दिसून आले. भारताच्या अंतिम अकरामध्ये एक स्विंग गोलंदाज हवा होता, असे अनेकांनी म्हटले.

त्याबाबत बोलताना पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट म्हणाला, “मला वाटते भुवनेश्वर कुमार भारतीय संघात असायला हवा होता. कारण तो भारताचा सर्वोत्कृष्ट स्विंग गोलंदाज आहे. संघ व्यवस्थापनाने त्याला इंग्लंडमध्ये न्यायला हवे होते. कारण, तिथे चेंडू स्विंग होतो. अंतिम सामन्यात खेळलेल्या भारतीय संघातील वेगवान गोलंदाज वेगवान गोलंदाजी करत. स्विंगची बात करायची झाल्यास, भुवनेश्वर हा जेम्स अँडरसनच्या बरोबरीला उभा राहतो म्हणूनच मला वाटते की तो संघात असायला हवा होता.”

भारताची इंग्लंड विरुद्ध परीक्षा
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील पराभव करून भारतीय संघाला ४ ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेवर लक्ष केंद्रित करावे लागेल. सध्या ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी यांच्यासह मोहम्मद सिराज व उमेश यादव हे वेगवान गोलंदाज इंग्लंड दौऱ्यावर संघाचा भाग आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

ऑस्ट्रेलिया संघापुढे मोठा पेच, टी२० विश्वचषकाची अंतिम फेरी गाठल्यास होणार मोठे नुकसान

आनंदाची बातमी! बीसीसीआयच्या ‘या’ महत्त्वपुर्ण विनंतीला ईसीबीचा होकार, विराटसेनेचं काम झालं सोपं

पहिल्याच चेंडूवर विकेट मिळल्याने गेल अतिआनंदी, कार्टविल करत केलं भन्नाट सेलिब्रेशन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---