न्यूझीलंडविरुद्धचा जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना गमावल्यानंतर भारतीय संघ इंग्लंड संघाशी दोन हात करणार आहे. ४ ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेचा शुभारंभ होणार आहे. या मालिकेपुर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला (ईसीबी) सराव सामने आयोजण्याची विनंती केली होती.
सुरुवातीला ईसीबीने त्यांची ही विनंती फेटाळली होती. परंतु शुक्रवारी (०२ जुलै) ईसीबीकडून सराव सामन्यांच्या विनंतीला हिरवा कंदील मिळाला आहे. ‘विजय मिरर’मधील वृत्तानुसार, भारत-इंग्लंड कसोटी मालिकेपुर्वी पाहुणा संघ २ सराव सामने खेळू शकतो.
https://twitter.com/cricbuzz/status/1410859260867534848?s=20
यापुर्वी बीसीसीआयने ईसीबीकडे सराव सामने खेळू देण्याची मागणी केली होती. परंतु कोविड १९ च्या नियमांनुसार याप्रकारची योजना पूर्ण करणे कठीण दिसून येत होते. भारतीय संघाला काउंटी संघासोबत सराव सामने खेळायचे होते. परंतु ईसीबीच्या प्रवक्त्याने यासाठी स्पष्ट नकार दिला होता. मात्र आता भारतीय संघाची सराव सामने खेळण्याची मागणी पूर्ण होणार आहे.
कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यानंतर भारतीय २० दिवसांच्या सुट्टीवर गेला आहे. १४ जुलै रोजी सर्व खेळाडू लंडनमध्ये एकत्र जमणार आहेत. त्यानंतर ते डरहमला रवाना होऊन तिथे सराव सामने खेळू शकतात.
इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका
पहिली कसोटी- ४ ते ८ ऑगस्ट, नॉटिंघम
दुसरी कसोटी- १२ ते १६ ऑगस्ट, लॉर्ड्स
तिसरी कसोटी- २५ ते २९ ऑगस्ट, लीड्स
चौथी कसोटी- २ ते ६ सप्टेंबर, द ओव्हल
पाचवी कसोटी- १० ते १४ सप्टेंबर, मॅनचेस्टर
महत्त्वाच्या बातम्या-
पहिल्याच चेंडूवर विकेट मिळल्याने गेल अतिआनंदी, कोलांटी उड्या मारत केलं भन्नाट सेलिब्रेशन
विराटसेनेची चिंता शिगेला; शुबमनच्या दुखापतीविषयी मोठी माहिती आली पुढे, मालिकेला मुकण्याची शक्यता
पाकिस्तान बोर्डाची मोठी मागणी, चक्क ६ आयसीसी स्पर्धांचे यजमानपद भूषवण्याची दाखवली तयारी






