नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे रविवारी (१४ मार्च) भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात दुसरा टी२० सामना झाला. नाणेफेकीचा निकाल यजमानांच्या बाजूने लागल्यानंतर त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि पाहुण्यांना फलंदाजीचे आमंत्रण दिले. मात्र सामन्याच्या पहिल्या षटकातच इंग्लंडला मोठा धक्का बसला. त्यांचा सलामीवीर जोस बटलर याला भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने पायचित केले.
त्याचे झाले असे की, भारताचा कर्णधार विराट कोहलीने अनुभवी भुवनेश्वरच्या हाती सामन्यातील पहिले षटक सोपवले. त्याच्या षटकातील पहिल्या दोन चेंडूत इंग्लंडचा सलामी फलंदाज जेसन रॉयने एक धाव काढली. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर दुसरा सलामीवीर बटलर फलंदाजीसाठी आला. यावेळी भुवनेश्वरने शक्कल लढवत लेग स्टंपच्या बाजूने चेंडू टाकला.
यावर बटलरने आपली विकेट वाचवण्यासाठी उंच उडी घेतली. परंतु चेंडू जाऊन सरळ त्याच्या पायावरील पॅडला लागला. परिणामत भोपळाही न फोडता बटलर पव्हेलियनला परतला.
https://youtu.be/Ah2DeDmlCYg
#Bhuvi strikes in his very first over!
That will hit leg stump!@josbuttler goes for duckling 🐥!#TeamIndia got his striking bowler back!👏👏👏👏👏👏👏#INDvENG #INDvsENG #ENGvIND #ENGvsIND pic.twitter.com/Lne2bC5NcT— BlueCap 🇮🇳 (@IndianzCricket) March 14, 2021
वयाची तिशी पार करुनही भूवीचा हा अंदाज पाहून भारतीय क्रिकेटप्रेमी भलतेच खुश झाले. अनेकांनी त्याचे बटलरची विकेट घेतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आणि त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव केला आहे.
बटलरची विकेट गेल्यानंतर डेविड मलान आणि जेसन रॉयची जोडी मैदानावर स्थिरावली होती. त्यांनी चौफेर फटकेबाजी करत अर्धशतकी भागिदारीही रचली. मात्र भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने मलानला पायचित करत त्यांची भागिदारी तोडली. तो २३ चेंडूत २४ धावा करत तंबूत परतला. यादरम्यान त्याने ४ चौकार मारले.
महत्त्वाच्या बातम्या-
मुर्ती लहान पण किर्ती महान! इशान किशन करतोय भारताकडून पदार्पण, वाचा त्याच्या प्रवासाची रोमांचक कहाणी
INDvENG: युवा धुरंधर सूर्यकुमार-इशानचे भारतीय टी२० संघात पदार्पण; अशी राहिली आत्तापर्यंतची कामगिरी