भारतीय संघातील आघाडीचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमाराच्या पायाला दुखापत झाल्यामुळे तो संघाबाहेर राहिला होता, परंतु आता तो आपल्या संघात पुन्हा पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. नुकताच तो दुखापतीतून सावरल्यानंतर उत्तर प्रदेशकडून सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीमध्ये खेळला आहे. दरम्यान त्याने नुकतीच १९९९ च्या विश्वचषकातील एक आठवण सांगितली आहे.
त्याने नवोदित क्रिकेटपटूसाठी वेगवान गोलंदाजीचा ऑनलाइन कोर्स उपलब्ध करून देण्यासाठी फ्रंट रोशी यांच्यासोबत हातमिळवणी केली होती. नवीन खेळाडूंना वेगवान गोलंदाजी शिकवण्यास आणि युवा खेळाडूंना अधिक चांगला प्रदर्शन करण्यासाठी भुवनेश्वर कुमार मदत करू इच्छितो.
त्याच्या मते वेगवान गोलंदाजी आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात भारी पडते. जर आपण त्याबाबत निष्ठावान किंवा आपली कामगिरी चोख बजावत असाल तर आपल्याला विशिष्ट बाबींवर लक्ष देणे गरजेचे असते आणि आपण त्यात सुधारणा देखील करू शकतो. क्रिकेट शिकण्यासाठी वयाची अट लागत नसून तो एक कौशल्यावर आधारित असणारा खेळ आहे. त्यामुळे आपल्याला हवे असेल तेव्हा आपण ते शिकू शकतो.
खेळाच्या प्रती आपल्या आवडीबद्दल बोलताना भुवनेश्वर म्हणाला की, “मला आजही आठवते जेव्हा मी सन १९९९ मध्ये माझ्या बहिणीसोबत भारताविरुद्ध न्यूझीलंडचा सामना पाहत होतो. त्यावेळी भारत हा सामना हरला होता तेव्हा मी प्रचंड रडतो होतो. ती क्षण मी कधीच विसरू शकणार नाही, आणि त्यामुळेच मला माझी किकेटबद्दल उत्साह आणि आवड आहे”.
भुवनेश्वर कुमार हा भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज असून तो पहिल्यांदा चर्चेत आला तो महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद केल्यामुळे. परंतु, भारतीय ड्रेसिंग रुमपर्यंत त्याचा हा प्रवास हा त्याच्यासाठी सोपा नव्हता.
महत्त्वाच्या बातम्या –
दक्षिण आफ्रिकेला मिळणार नवा कसोटी कर्णधार; डी कॉकला कर्णधारपदावरून काढले जाणार