भारतीय संघ टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत तुफान फॉर्ममध्ये आहे. भारताने आतापर्यंत खेळलेले दोन्ही सामने आपल्या खिशात घातले आहेत. भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध पार पडला होता, तर दुसरा सामना नेदरलँड्सविरुद्ध खेळला गेला. या दोन्ही सामन्यात भारताने विरोधी संघांना पराभवाची धूळ चारत गुणतालिकेत अव्वल स्थानही पटकावले. असे असले, तरीही संघासोबतच संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यानेही या दोन सामन्यांमध्ये शानदार गोलंदाजी खास विक्रम रचला आहे.
भुवनेश्वरचा विक्रम
रविवारी (दि. 23 ऑक्टोबर) पाकिस्तानविरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात भारताने 4 विकेट्सने विजय मिळवला होता. या सामन्यात भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याने 4 षटके गोलंदाजी करताना 22 धावा देत 1 विकेट्स घेतली होती. यादरम्यान त्याने तब्बल 17 चेंडू निर्धाव (Dot Ball) टाकले होते. यानंतर गुरुवारी (दि. 27 ऑक्टोबर) नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यातही भारताने 56 धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात भुवनेश्वरने 3 षटके गोलंदाजी करताना 9 धावा देत 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या होत्या. विशेष म्हणजे, यावेळी त्याने 2 षटके निर्धाव टाकली होती. तसेच, यामधील 13 चेंडू हे निर्धाव होते. म्हणजेच, या चेंडूंवर फलंदाजाला एकही धाव घेता आली नव्हती.
At the end of the powerplay, Netherlands are 27/2.
Live – https://t.co/GVdXQKGVh3 #INDvNED #T20WorldCup pic.twitter.com/C6lupDAMOd
— BCCI (@BCCI) October 27, 2022
अशाप्रकारे भुवनेश्वरने या विश्वचषकात खेळलेल्या 2 सामन्यात 7 षटके गोलंदाजी केली. या षटकांमधील 42 चेंडूंपैकी त्याने 30 चेंडू हे निर्धाव टाकले होते. त्याच्या फक्त 12 चेंडूंवर फलंदाजांना धावा काढता आल्या. या टी20 विश्वचषकात हा विक्रम त्याने आपल्या नावावर केला.
भुवनेश्वर कुमारची आंतरराष्ट्रीय मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कारकीर्द
भुवनेश्वर कुमार याने भारतीय संघाकडून एकूण 81 आंतरराष्ट्रीय टी20 सामने आणि 121 वनेड सामने खेळले आहेत. टी20तील 80 डावात गोलंदाजी करताना त्याने 88 विकेट्स घेतल्या आहेत. या विकेट्स त्याने 6.96च्या इकॉनॉमी रेटने घेतल्या आहेत. 4 धावा देत 5 विकेट्स ही त्याची टी20 क्रिकेट कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आहे. याव्यतिरिक्त वनडेत त्याने 120 डावात गोलंदाजी करताना 141 विकेट्स घेतल्या आहेत. या विकेट्स त्याने 5.08च्या इकॉनॉमी रेटने घेतल्या आहेत. 42 धावा देत 5 विकेट्स ही त्याची वनडेतील सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पावरप्लेमध्येच न्यूझीलंडचे वाजले बारा! ऑस्ट्रेलियाला चोपणारे सलामीवीर श्रीलंकेपुढे ढेर
सामन्यापूर्वी पत्नीचा ‘हा’ नियम पाळतो सूर्यकुमार, फलंदाजीला उतरताच करतो गोलंदाजांचं काम तमाम