भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख फलंदाज विराट कोहली याच्यावर भारतीय संघाचे मदार मागील दहा वर्षांपेक्षा जास्त काळापासून आहे. तो संघाच्या फलंदाजीची धुरा वाहताना दिसतो. त्याचवेळी विराट आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात गोलंदाजी देखील करत असे. मागील काही काळापासून त्याने गोलंदाजी करणे जवळपास बंद केले आहे. त्याच्या याच गोलंदाजीविषयी भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने एक मजेदार टिप्पणी केली आहे.
एका कार्यक्रमात बोलताना भुवनेश्वर कुमार याने विराट कोहली विषयी अनेक किस्से सांगितले. विराट कोहलीच्या गोलंदाजीबाबतचा एक किस्सा देखील त्याने यावेळी सांगितला. तो म्हणाला,
“विराट कोहली हा स्वतःला एक उत्कृष्ट गोलंदाज मानतो. मात्र, तो गोलंदाजी करू लागला की आम्हाला भीती वाटते. कारण, त्याची गोलंदाजी शैली अशी आहे की, त्याला दुखापत होऊ शकते.”
विराटने अखेरच्या वेळी मागील आशिया चषकात हॉंगकॉंगविरूद्ध एक षटक टाकले होते. यात त्याने 6 धावा दिलेल्या. त्याने आपल्या कारकिर्दीत 501 सामने खेळले असले तरी, केवळ 8 बळी मिळवले आहेत. आगामी वनडे विश्वचषकात तो गोलंदाजी करू शकतो.
(Bhuvneshwar Kumar Said Virat Kohli Belive He Is Best Bowler)
महत्वाच्या बातम्या-
“धोनीने रोहितला 2011 वर्ल्डकपसाठी डावललेले”, माजी निवडसमिती सदस्याचा धक्कादायक खुलासा
अल्टिमेट टेबल टेनिस लीगमध्ये जयपूर पॅट्रीओट्स या नव्या फ्रँचायझीची एन्ट्री






