भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला शांत स्वभावाचा क्रिकेटपटू समजले जाते. तो वेगवान गोलंदाजी नक्कीच करतो. परंतु त्याला मैदानावर कधीच रागावताना पाहिले नाही. तरी भुवनेश्वर आपल्या उत्तराने समोरच्या व्यक्तीचे बोलणे नक्कीच बंद करतो.
अशाच प्रकारे त्याने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज आणि सनरायजर्स हैद्राबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरबरोबर (David Warner) इंस्टाग्राम लाईव्ह चॅट केले. यादरम्यान वॉर्नरने त्याला प्रश्न विचारला होता, त्यावर भुवनेश्वरने उत्तर देत वॉर्नरची बोलती बंद केली आहे.
या लाईव्ह चॅटदरम्यान वॉर्नरने भुवनेश्वरला (Bhuvneshwar Kumar) प्रश्न विचारला की, “जर टी२० विश्वचषकातील अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर सुरु असेल, तेव्हा शेवटच्या चेंडूवर ४ धावा हव्या असतील तर तू कोणता चेंडू टाकशील?”
SavageBhuvi.mp4#WarnersCorner #OrangeArmy #SRH pic.twitter.com/8fbhAt9jOW
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 24, 2020
भुवनेश्वरने वॉर्नरच्या या प्रश्नावर उत्तर देत म्हटले की, “जर शेवटच्या चेंडूवर ४ धावा हव्या असतील तर मी नकल बॉल टाकेल. तसेच किंवा मग उसळी चेंडूही टाकू शकतो. कारण मेलबर्न क्रिकेट मैदानाची सीमारेषा (बाऊंड्री लाईन) खूप मोठी आहे. तसं पाहिलं तर मला नाही वाटत की, मला तुला चेंडू टाकण्याची आवश्यकता आहे. कारण मी तुला पहिल्या काही षटकांमध्येच बाद करेल.” भुवनेश्वरचे हे उत्तर (Answer) ऐकून वॉर्नरदेखील हसू लागला.
भुवनेश्वरचा डावखुऱ्या फलंदाजांविरुद्धची कामगिरी चांगली आहे. त्याचा आऊट स्विंग चेंडू नेहमी डावखुऱ्या फलंदाजांना त्रासदायक ठरतो. वॉर्नर आणि ख्रिस गेल यांसारख्या दिग्गज फलंदाजांनाही तो चिंतेत टाकतो. त्याच्या चेंडूवर चौकार मारणे सोपे नाही. याव्यतिरिक्त अंतिम षटकांमध्ये तो आपल्या नकल बॉलने खेळाडूंना खूप चिंतेत टाकतो.
आयपीएलमध्ये हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) संघाच्या विजयात इतर खेळाडूंबरोबरच वॉर्नर आणि भुवनेश्वर या दोन खेळाडूंचे मोठे योगदान असते. आयपीएलमध्ये हे दोन्ही खेळाडू चांगली कामगिरी करतात. त्यामुळे संघाला विजय मिळण्यात मोठी मदत होते.
भुवनेश्वर मागील काही दिवसांपासून दुखापतीचा सामना करत होता. त्याला हर्नियाची दुखापत झाली होती. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकला नव्हता. तरी आता भुवनेश्वर फीट आहे. तसेच क्रिकेट जेव्हा सुरु होईल, तेव्हा तो आपल्या गोलंदाजीने सर्वांना आश्चर्यचकीत करण्याचा प्रयत्न करेल.
ट्रेंडिंग घडामोडी-
-हर्षा भोगलेंचं नाव ऐकल्यावर तुमच्या डोक्यात पहिलं काय येतं? मांजरेकर म्हणतात…
-मॅच हारल्यावर धोनी काय करतो? त्या खेळाडूने अखेर जगाला सांगतिला धोनीचा तो ‘राज’
-विश्वविजेत्या खेळाडूंना द्यायला पैसे नव्हते म्हणून लतादीदींनी गायलं होतं गाणं