वेस्ट इंडिजचा आक्रमक सलामीवीर फलंदाज ख्रिस गेलने त्याचा माजी संघसहकारी रामनरेश सारवानला साप म्हणत टिका केली आहे. तसेच त्याने सारवानला तो कोराना व्हायरसपेक्षाही वाईट असल्याचेही म्हटले आहे. गेलने ही टिका त्याला कॅरेबीयन प्रीमीयर लीगमधील (सीपीएल) जमैका तलावहाज संघातून बाहेर केल्यानंतर केली आहे. सारवान त्या संघाचा प्रशिक्षक आहे.
गेलने त्याच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर तीन भागात प्रदर्शिक केलेल्या व्हिडिओमध्ये ही टिका केली आहे. त्याने म्हटले आहे की ‘सारवान तू सध्या कोरोना व्हायरसपेक्षाही वाईट आहेस.’
जमैका संघाने सीपीएलच्या येत्या मोसमासाठी गेलला संघातून बाहेर करण्याचा निर्णय घेतला आहे. तो या संघाकडून सीपीएलचे पहिले ४ मोसम खेळला होता. त्यानंतर तो पुढचे २ मोसम सेंट किट्स अँड नेविस पॅट्रिओट्सकडून खेळला. पण त्यानंतर तो पुन्हा जमैकासंघात सहभागी झाला होता.
पण आता त्याला जमैकाने बाहेर केल्यानंतर सेंट लुसिया झुक्स संघाने त्याला सीपीएल २०२० साठी संघात घेेतले आहे. या संघाचा कर्णधार डॅरेन सॅमी आहे आणि प्रशिक्षक अँडी फ्लॉवर आहेत.
गेल सारवान बद्दल बोलताना म्हणाला, ‘जेव्हा मी जमैका तलावहाज संघात परत आलो तेव्हा सारवान सहाय्यक प्रशिक्षक होता. माझ्यात आणि सारवानमध्ये चर्चा झाली, त्याला मुख्य प्रशिक्षक व्हायचे होते. जेव्हा मी जमैका सोडले, तेव्हा तो एक उर्जेने भरलेला संघ होता. पण जेव्हा मी तिथे नव्हतो तेव्हा माझ्याकडे अनेक तक्रारी येत होत्या, त्यावेळेस सारवान आणि कर्णधार असलेल्या रसेलमध्ये समस्या होत्या. बर्याच खेळाडूंना सारवानमुळे त्रास झाला.’
तसेच गेल पुढे म्हणाला, ‘जमैकाच्या संघाशी जे काही झाले ते तुझ्यामुळे. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी, माझे कौतुक करणारे मोठे भाषण देणारा सारवान तूच आहेस. सारवान तू एक साप आहेस. तू कॅरिबियनमध्ये कोणालाही आवडत नाही. सारवान तू अपरिपक्व आहेस आणि तू माझ्यावर पाठीमागून वार केले.’
‘तू सर्वांसमोर संत म्हणून राहिलास. स्वत: चांगला माणूस असल्याचे भासवले पण तू वाईट आहेस आणि तू एक विष आहेस.’
‘१९९६च्या काळातील मी एकटाच सक्रिय आहे आणि खेळत आहे. बाकी सर्वजण निवृत्त झाले आहेत. मी त्या काळातील सध्या उभा असलेला शेवटचा खेळाडू आहे. आणि मी अजून मजबूत आहे. त्यामुळे त्यांना एक प्रकारचे दु:ख आहे की ख्रिस गेल अजूनही खेळत आहे आणि अजूनही यशस्वी आहे. हे पहा, मी भूतकाळातील आणि सध्याच्या खेळाडूंबद्दल बोलत आहे. परंतु मी तुझ्याशी सामना करत राहिल सारवान. जेव्हा जेव्हा वेळ येईल तेव्हा मी इतरांचाही सामना करेल.’
https://www.youtube.com/watch?v=Ws5gpi_rvAk
ट्रेंडिंग घडामोडी –
जेवण चोरताना पकडली गेली पाकिस्तानी खेळाडूची पत्नी, सोशल मीडियावर झाला व्हिडिओ व्हायरल
३०वर्षांनी मोठ्या फूटबाॅलपटूच्या आईला करत होता तो डेट, नंतर आली वेगळीच गोष्ट समोर
कोरोनामुळे भारतीय खेळाडूचा दुर्दैवी मृत्यु, मृत्युपुर्वी केली होती मोठी समाजसेवा