नवी दिल्ली। भारतात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार झाल्यामुळे बीसीसीआयने खेळाडूंना पूर्णपणे सूट दिलेली नाही. अशामध्ये भारतीय संघाचे जवळपास सर्वच खेळाडू घरात वेळ घालवत आहेत तसेच सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत.
यादरम्यान भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनेही (Bhuvneshwar Kumar) ट्विटरवर एका चाहत्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. त्याला एका चाहत्याने त्याच्या पगाराबद्दल विचारले होते, “तुमचा पहिला पगार (Payment) किती होता? तुम्हाला आठवते का, की तुम्ही त्या रुपयांचे काय केले होते?”
चाहत्याच्या या प्रश्नाचे उत्तर देताना भुवनेश्वर म्हणाला, “माझा पहिला पगार ३००० रुपयांचा होता. त्या रूपयांनी मी शॉपिंग केली होती तसेच त्यातून काही रूपयांची बचतही केली होती.”
https://twitter.com/BhuviOfficial/status/1282244579672985601
यापूर्वी भुवनेश्वरने एका मुलाखतीदरम्यान मेरठमध्ये क्रिकेट अकादमी सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तो म्हणाला होता, “मला मेरठमध्ये एक अकादमी सुरु करायची आहे. कारण याने मला खूप काही दिले आहे. मला हे केवळ तेथील लोकांना पुन्हा द्यायचे आहे. हे असे आहे, जे मी निश्चित करणार आहे.”
भुवीने भारताकडून २१ कसोटी सामने, ११४ वनडे सामने आणि ४३ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ६३ विकेट्स, वनडेत १३२ विकेट्स आणि टी२०त ४१ विकेट्स घेतल्या आहेत.
कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) मागील ४ महिन्यांपासून क्रिकेटवर लागलेला ब्रेक एकदाचा सुटला आहे. कारण वेस्ट इंडिज क्रिकेट संघाने इंग्लंड दौऱ्यात ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात करत क्रिकेटच्या वाटा पुन्हा खुल्या केल्या आहेत. याव्यतिरिक्त जगभरातील अनेक चाहते आयपीएलची वाट पाहत आहेत. परंतु बीसीसीआयने आयपीएलबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही.






