भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध (INDvAUS)शेवटचे दोन सामने जिंकले असले तरी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा चांगलाच चर्चेत आला आहे. त्याची गोलंदाजी 19व्या षटकात संघासाठी घातक ठरत आहे. यामुळे भारताने काही सामने गमावले देखील आहे. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यातील 19व्या षटकात 16 धावा दिल्या. यामुळे त्याला दुसऱ्या टी20 सामन्यात अंतिम अकरामधून वगळले गेले, मात्र तिसऱ्या सामन्यात त्याला पुन्हा संघात घेतले.
हैद्राबाद येथे झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याने 3 षटकात 39च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. यावेळी त्याने भारतासाठी धोकादायक ठरणाऱ्या कॅमेरून ग्रीन (52 धावा) याची विकेट घेतली. भुवनेश्वरने धावा जरी दिल्या असल्या तरी त्याने एक विश्वविक्रम केला आहे. तो 2022मध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 विकेट्स घेणारा वेगवान गोलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा एँड्र्यू टे याच्या नावावर होता. त्याने 2021मध्ये 31 विकेट्स घेतल्या होत्या, आता भुवनेश्वरने 32 विकेट्स घेताना त्याला मागे टाकले आहे.
भारतीय खेळाडूंची बाब पाहिली तर एका वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 विकेट्स घेण्याचा विक्रम भुवनेश्वरच्याच नावावर आहे. या यादीत जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 2016मध्ये 28 विकेट्स घेतल्या होत्या. तर सर्व संघाच्या खेळाडूंची यादी पाहिली तर एका वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 विकेट्स घेण्याच्या यादीत बुमराह तिसऱ्या स्थानावर आहे.
भुवनेश्वरला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी संघात घेतलेले नाही, मात्र त्याला टी20 विश्वचषकासाठी संघात निवडले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका भारतात 28 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, तर टी20 विश्वचषकाला 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात खेळला जाणार आहे. भुवनेश्वरने आशिया चषक 2022च्या स्पर्धेतील शेवटच्या सामन्यात उत्तम गोलंदाजी केली होती. त्याने 4 षटकात 4 धावा देत 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर मात्र त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध अधिक धावा खर्च केल्या आहेत. त्यामुळे संघाची चिंंता वाढली आहे.
एका वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 विकेट्स घेणारे वेगवान गोलंदाज
32 – भुवनेश्वर कुमार, 2022
31 – एँड्र्यू टे, 2021
28 – जसप्रीत बुमराह, 2016
28 – मुस्तफिजूर रहमान, 2021
28 – जोशुआ लिटिल, 2022
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल गाजवलेला अनुरीत सिंग सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त! पंजाबसाठी खेळताना मिळवलेली ओळख
भारतीय संघाची साथ सोडून हार्दिक पंड्या निघालाय नवीन दौऱ्यावर, पाहा फोटो
INDvsAUS: सूर्यकुमार यादवच्या विलक्षण खेळीने शिखर धवनचा ‘हा’ विक्रम धोक्यात