---Advertisement---

‘WTC फायनलमध्ये तुला मिस केलं’, भुवनेश्वरच्या पत्नीने फोटो शेअर करताच चाहत्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस

On: शुक्रवार, जून 25, 2021 4:14 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवेश्वर कुमार 18 ते 23 जून दरम्यान झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम  सामन्यांमध्ये भारतीय संघाचा भाग नव्हता. तरी देखील सध्या भुवनेश्वर सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकताच भुवनेश्वरची पत्नी नुपूर नागरने त्याच्यासोबतचा एक क्यूट सेल्फी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. ज्यावर भुवनेश्वरच्या चाहत्यांनी बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत.

जेव्हापासून भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सुरुवात झाली, तसा भुवनेश्वर कुमार देखील ट्विटरवर ट्रेंड करत होता. हा अंतिम सामना चुरशीचा झाला. मात्र, या सामन्यात भारताला स्विंग गोलंदाजी चांगली करु शकणाऱ्या गोलंदाजाची कमी भासली. या सामन्यादरम्यान बराचवेळ ढगाळ वातावरण असल्याने स्विंग गोलंदाजीला मदत मिळत होती. मात्र, भारताकडे प्रामुख्याने स्विंग गोलंदाजी करणारा गोलंदाज संघात नव्हता. त्यामुळे अनेकांना भुवनेश्वरची कमतरता जाणवत होती. भुवनेश्वर हा त्याच्या स्विंग गोलंदाजीसाठी ओळखला जातो.

याचदरम्यान नुपूरने आपल्या इंस्टाग्रामवर भुवनेश्वरबरोबरचा फोटो शेअर केला. त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने इमोजीचा वापर केला होता. नुपूर आणि भुवनेश्वरच्या या फोटोला चाहत्यांची मोठी पसंती मिळत आहे. तसेच  भुवनेश्वरच्या बऱ्याच चाहत्यांनी त्याची कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत कमी भासली असल्याच्या प्रतिक्रिया या फोटोच्या खाली लिहिल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CQdZF5aBnQJ/

अंतिम सामन्यांमध्ये भारताकडून जे 3 वेगवान गोलंदाज खेळले होते ते सीम गोलंदाज होते. मोहम्मद सिराज देखील स्विंग गोलंदाज आहे. जो अशा परिस्थितीमध्ये मोहम्मद सिराजने उत्कृष्ट गोलंदाज म्हणून प्रदर्शन करू शकला असता. परंतु मोहम्मद सिराजला अंतिम सामन्यांमध्ये खेळणाऱ्या अकरा खेळाडूंच्या यादीत स्थान मिळाले नव्हते.

भारताला या अंतिम सामन्यात 8 विकेट्सने पराभवाचा धक्का बसला. तसेच न्यूझीलंडच्या रुपात कसोटी क्रिकेटला पहिला विश्वविजेता संघ मिळाला.

महत्त्वाच्या बातम्या – 

जेव्हा विश्वचषक जिंकल्यानंतर विरोधी संघाकडून दारु उधार घेत ‘कपिल पाजीं’नी केले होते सेलिब्रेशन

धोनीच्या भिडूचा ‘फुटबॉल किक रनआऊट’ तूफान व्हायरल, तुम्हीही घ्या पाहून

लंकादहन करण्यासाठी ‘यंग ब्लू आर्मी’ होतेय सज्ज, बीसीसीआयने शेअर केला खास व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---