शनिवारी(8 सप्टेंबर) यूएस ओपन स्पर्धेतील महिला एकेरीचा अंतिम सामना कॅनडाच्या बियांका अँड्रेस्क्यू आणि सेरेना विल्यम्स यांच्यात पार पडला. या सामन्यात 19 वर्षीय बियांकाने सेरेनाचा 6-3,7-5 अशा फरकाने पराभव करत कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवले.
बियांका ओपन इरामध्ये(1968 नंतर) ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवणारी कॅनडाची पहिली महिला टेनिसपटू ठरली आहे.
बियांकाने या सामन्यात 37 वर्षीय सेरेनावर सुरुवातीपासूनच वर्चस्व ठेवले होते. तिने पहिला सेट 6-3 असा सहज जिंकला. तसेच दुसऱ्या सेटमध्येही तिने 5-1 अशी आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर सेरेनाने दमदार पुनरागमन करत सलग 4 गेम्स जिंकले. पण त्यानंतर बियांकाने पुढील 2 गेम्स जिंकत पहिल्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाला गवसणी घातली.
विशेष म्हणजे बियांका यूएस ओपनच्या मुख्य फेरीत प्रथमच खेळत होती. तसेच ती ग्रँडस्लॅममधील चौथ्यांदाच मुख्य स्पर्धेत खेळत होती.
या विजेतेपदानंतर आता सोमवारी जाहीर होणाऱ्या जागतिक महिला क्रमवारीमध्ये बियांका 5 व्या क्रमांकावर झेप घेणार आहे. ही तिची कारकिर्दीतील सर्वोच्च क्रमवारी असेल. तसेच कॅनडाच्या महिला टेनिसपटूने मिळवलेल्या सर्वोत्तम क्रमवारीचीही ती बरोबरी करेल.
बियांकाने या मोसमात तीन विजेतीपदे मिळवली आहेत. यूएस ओपनचे विजेतेपद मिळवण्याआधी तिने इंडियन वेल्स आणि कॅनडा ओपनचे विजेतेपद मिळवले आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–असा होणार आहे पुढीलवर्षी महिला टी२० विश्वचषक, जाणून घ्या सर्वकाही…
–चौथ्या ऍशेस सामन्यात शून्यावर बाद होणाऱ्या डेव्हिड वॉर्नरच्या नावावर झाले हे ३ नकोसे विक्रम