ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉनसन मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर जॉनसनने वॉर्नरवर एक कॉलम लिहून निशाणा साधला होता. पण आता हे लिखान जॉनसला महागात पडल्याचे दिसते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जॉनसनने मोठी कारवई केल्याचे बोलले जात आहे.
डेव्हिड वॉर्नर (David Warner) ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या इतिहासातील (Cricket Australia) एक महत्वाचे नाव आहे. त्याने ऑस्ट्रेलियन संघाला सलामीवीर फलंदाज म्हणून अनेक सामन्यात मोलाजे योगदान दिले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषकातही त्याने ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आणि संघाला विजेतेपद मिळवून दिले. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियन संघाला पाकिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. कदाचित वॉर्नरसाठी ही शेवटची कसोटी मालिका असेल. सलामीवीर फलंदाजाने पूर्वीच याविषयीचे संकेत सर्वांना दिले होते. अशात वॉर्नरच्या निवृत्तीच्या चर्चा होणे सहाजिक आहे.
पण मिचेल जॉनसन (Mitchell Johnson) याला वॉर्नरला मिळत असलेला हा निरोप आणि त्याच्या चर्चा योग्य वाटत नाहीत. ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक चर्चेत राहिलेला वादाचा विषय म्हणजे बॉल टॅम्परिंग. वॉर्नर या प्रकरणात सामील असल्यामुळे त्याला अशा प्रकारे निरोप देणे योग्य नाही, असे जॉनसनने या कॉलममध्ये लिहिले होते. जॉनसच्या या टीकेला उस्मान ख्वाजा आणि काही इतर खेळाडूंनी प्रत्युत्तर दिले. पण स्वतः क्रिकेट ऑस्ट्रेलिया देखील जॉनसनविरोधात ऍक्टिव्ह झाल्याचे दिसते.
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिकेदरम्यान, जॉनसन समालोचकाच्या भूमिकेत दिसणार होता. पण मागच्या काही दिवसांमध्ये घडलेल्या प्रकारांनंतर त्याचे नाव समालोचकांच्या यादीतून कमी करण्यात आले आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार या यादीत जॉनसनव्यतिरिक्त मर्व ह्यूज, वसीम अक्रम आणि मार्क टेलर यांची नावे होती. पण आता जॉनसनला वगळून या तिघांचीच नावे कायम ठेवली गेली आहेत. (Big action by Cricket Australia on Mitchell Johnson)
महत्वाच्या बातम्या –
रवी बिश्नोईची मोठी झेप, बनला जगातील नंबर एकचा गोलंदाज! ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ठरली महत्वाची
कैफच्या संघाला नमवत रैनाच्या संघाची फायनलमध्ये धडक, सलामी फलंदाजाने झळकावले शानदार शतक