---Advertisement---

शेवटचे षटक, १२ धावांची गरज अन् २ चेंडूंवर गेल्या २ विकेट्स, सिडनी सिक्सर्सची अशी फायनलमध्ये धडक

On: गुरूवार, जानेवारी 27, 2022 5:17 PM
Sydney-Sixers-BBL
---Advertisement---

ऑस्ट्रेलियात सुरु असलेली बिग बॅश लीग (Big Bash League) अंतिम टप्प्यात पोहचली आहे. बुधवारी (२६ जानेवारी) उपांत्य पूर्व फेरी पार पडली. यात सिडनी (Sydney Sixers) संघाने विजय मिळवला. शेवटच्या षटकात रोमांचक झाला. सिडनी सिक्सर्स संघाने ऍडलेड स्ट्रायकर्सचा ४ गडी राखुन पराभव करत अंतिम फेरीतील स्थान निश्चीत केले आहे. अंतिम फेरीत विजेतेपदासाठी सिडनी संघाचा सामना पर्थ स्काॅचर्सशी होणार आहे.

या सामन्यातील शेवटच्या षटकात सिडनीला १२ धावांची गरज होती. त्यातील सुरुवातीच्या दोन चेंडूंवर दोन गडी बाद झाले. या कठीण परिस्थीतीत सिडनीचा फलंदाज हेडन केरच्या अप्रतिम खेळीमुळे सिडनीला फक्त विजयच नाही, तर अंतिम फेरीत स्थान सुद्धा मिळवता आले.

व्हिडिओ पाहा- आणि विराट कोहलीला धरावे लागले सचिनचे पाय ।

सिडनी सिक्सर्स संघाने १९ षटकांत ४ गडी गमावत १५६ धावांची शानदार खेळी केली होती. शेवटच्या षटकात १२ धावा हव्या असताना सीन एबाॅट आणि हेडन केर हे फलंदाज खेळपट्टीवर उपस्थित होते. तर हॅरी कॉनवे गोलंदाजी करत होता. त्याने पहिल्या चेंडूतच सीन एबाॅटची विकेट घेतली. त्याने २० चेंडूत ६ षटकार आणि २ चौकारांसह तब्बल ४१ धावांचे योगदान दिले. तो बाद झाल्यानंतर उपस्थित फलंदाजांनी धावून एक धाव काढली. अशा स्थितीत सिडनीसमोर विजयासाठी ४ चेंडूत ११ धावाचे लक्ष्य होते.

https://twitter.com/BBL/status/1486582760869294080?s=20

तिसऱ्या चेंडूत जाॅर्डन सिल्कने एक धाव घेतली आणि आता स्ट्राइकवर हेडन आला होता. चौथ्या चेंडूवर षटकार मारला आणि पाचव्या चेंडूवर धावुन दोन धावा काढल्या. पण धाव काढताना त्रास झाल्याने फलंदाज सिल्क रिटायर हर्ट झाला. शेवटच्या चेंडूत २ धावांची गरज असताना हेडन केरने चौकार मारला आणि हा सामना सिडनीने जिंकला.

https://twitter.com/BBL/status/1486314728100093952?s=20

हेडन केर हा १६ धावांवर झेलबाद होण्यापासून वाचला होता आणि त्यानंतर त्याने ५८ चेंडूत नाबाद ९८ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. त्याने आपल्या खेळीत १० चौकार आणि २ षटकार मारले. त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले. बिग बॅश लीगचा अंतिम सामना २८ जानेवारीला मेलबर्नमध्ये पर्थ स्कॉचर्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यात पाहायला मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘मला भेटलेल्या सर्व क्रिकेटपटूंपैकी धोनी सर्वात हुशार’, भारतात अपमान झालेला ऑस्ट्रेलियन दिग्गज करतोय कौतुक

खरेदीदार आहे का? ‘हा’ प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू बिटकॉइनसाठी विकतोय ट्विटर अकाऊंट, वाचा सविस्तर

कसोटीसाठी कर्णधारपदाच्या शर्यतीत असलेला बुमराह, नेतृत्वासाठी योग्य नाही, रवी शास्त्रींनी सांगितले कारण

हेही पाहा-

आणि विराट कोहलीला धरावे लागले सचिनचे पाय । Virat Touched Sachin's Feet

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---