ऑस्ट्रेलियाच्या प्रसिद्ध बिग बॅश लीगने आता क्लबला तीन आंतरराष्ट्रीय खेळाडूंना संघात स्थान देण्याची परवानगी दिली आहे. क्लबला सॅलरी कॅपच्या अतिरिक्त पैसे खर्च करून आंतरराष्ट्रीय खेळाडूंना खेळण्याची परवानगी दिली आहे.या निर्णयानंतर अनेक भारतीय खेळाडू क्लबच्या रडारवर आहेत.
दोन आंतरराष्ट्रीय खेळाडूंना खेळण्याची होती परवानगी
सन 2010 मध्ये बिग बॅश लीगला सुरूवात झाली होती. क्लबला त्यांच्या संघात केवळ दोन परदेशी खेळाडूंना स्थान देण्याची परवानगी देण्यात आली होती. स्थानिक खेळाडूंना अधिक संधी देणे आणि प्रोत्साहित करणे हे यामागील कारण होते.
युवराज बिगबॅशमध्ये खेळण्यासाठी आहे उत्सुक
भारताचा माजी कर्णधार धोनी आणि स्टार फलंदाज सुरेश रैना हे दोघेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ऑगस्टमध्ये निवृत्त झाले आहेत. भारताचा डावखुरा फलंदाज युवराजनेही 2019 मध्ये बीसीसीआयच्या अंतर्गत असलेल्या सर्व क्रिकेट प्रकारातून निवृत्ती घेतली होती.
पण त्याने नुकतेच निवृत्तीतून बाहेर येत पंजाबकडून रणजी करंडक स्पर्धेत खेळण्याविषयी घोषणा केली होती. तथापि, बीसीसीआयने अद्याप यावर निर्णय घेतला नाही. पण युवराज निवृत्त झालेला असल्याने बिग बॅशमध्ये खेळणे त्याच्यासाठी सुकर होईल. सूत्रांच्या माहितीनुसार युवराज बीबीएलमध्ये खेळायला उत्सुक आहे.
रैना आणि धोनी या दोघांनाही घ्यावी लागेल बीसीसीआयटी परवानगी
तथापि धोनी आणि रैना यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी बीसीसीआयकडून बीबीएल खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घ्यावे लागेल. हे दोघेही आयपीएलचा महत्त्वाचा भाग आहेत आणि बीसीसीआयच्या नियमांनुसार कोणत्याही भारतीय क्रिकेटशी संबंधित किंवा बीसीसीआय अंतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटपटूला बाहेरील कोणत्याही लीगमध्ये सहभागी होण्यासाठी बोर्डाकडून एनओसी घ्यावी लागते.
महत्त्वाच्या बातम्या –
एमएस धोनीच्या गावचा पोरगा, जो चेन्नईकडून आयपीएलमध्ये करतोय पदार्पण
चेंडू आहे की बंदुकीची गोळी! नॉर्किएने फेकलेल्या योर्करवर त्रिपाठी क्लीन बोल्ड, पाहा व्हिडिओ
दिल्लीच्या फलंदाजांना लोळवणारा मिस्ट्री स्पिनर तुम्हाला माहित आहे का? पहिल्यांदाच घेतल्यात ५ विकेट्स
ट्रेंडिंग लेख –
वॉटसनसह ‘या’ ३ दिग्गजांना पुढच्या हंगामात मिळणार डच्चू?
आयपीएल२०२० मध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकवणारे ४ खेळाडू; एका भारतीयाचाही समावेश
कमी धावा झाल्या म्हणून काय झालं! त्यातूनही मार्ग काढून थरारक विजय मिळवणारे ५ संघ