---Advertisement---

ऋतुराज दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर, BCCIने सांगितले कुणाची लागली वर्णी

On: शनिवार, डिसेंबर 23, 2023 2:40 PM
Ruturaj-Gaikwad
---Advertisement---

Ruturaj Gaikwad Ruled Out: भारतीय संघाला दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेला सुरुवात होण्यासाठी फक्त 3 दिवस उरले आहेत. मात्र, त्यापूर्वीच भारतीय संघासाठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा सलामी फलंदाज ऋतुराज गायकवाड आगामी मालिकेतून बाहेर पडला आहे. याची माहिती स्वत: बीसीसीआयने ट्वीट करत दिली आहे.

ऋतुराजच्या जागी कुणाची वर्णी?
ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) कसोटी मालिकेतून बाहेर पडल्यामुळे पुरुष निवड समितीने त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून अभिमन्यू ईश्वरन (Abhimanyu Easwaran) याला संघात सामील केले आहे. ऋतुराजला केबेरहा येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत क्षेत्ररक्षण करताना उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. त्याचे स्कॅन करण्यात आले, ज्यानंतर बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला उर्वरित दौऱ्यातून बाहेर केले आहे. तो आपल्या दुखापतीतून सावरण्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये जाईल.

बीसीसीआयने ‘या’ खेळाडूंनाही घेतलं ताफ्यात
वेगवान गोलंदाज हर्षित राणा हादेखील दक्षिण आफ्रिका ए संघाविरुद्ध 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या 4 दिवसीय सामन्यातून बाहेर पडला आहे. निवड समितीने रजत पाटीदार, सरफराज खान, आवेश खान आणि रिंकू सिंग या खेळाडूंना भारत अ संघात सामील केले आहे. तसेच, कुलदीप यादव याला भारतीय संघातून वगळले आहे.

दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध 4 दिवसीय सामन्यासाठी भारतीय अ संघ-
अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, सरफराज खान, तिलक वर्मा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वाशिंग्टन सुंदर, आवेश खान, नवदीप सैनी, आकाश दीप, विधाथ कवरप्पा, मानव सुथार, रिंकू सिंग (big blow for india ruturaj gaikwad ruled out of the ind vs sa test series bcci announces replacement abhimanyu easwaran)

हेही वाचा-
‘तुम्ही सतत दाखवा…, भांडण फक्त मैदानावर’, विराटविषयी गंभीरचे मन जिंकणारे विधान; Video पाहून चाहतेही फिदा
हे प्रभू…! चेंडू मारला अन् बिनधास्त क्रीझच्या बाहेर आली मूनी, भारतीय खेळाडूने पुढं काय केलं एकदा पाहाच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---