पुरूष क्रिकेट संघांचा आठवा टी20 विश्वचषक (T20 World Cup) अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. यातील उपांत्य फेरीचा दुसरा सामना भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात गुरूवारी (10 नोव्हेंबर) खेळला जाणार आहे. या सामन्यात इंग्लंडचे डेविड मलान आणि मार्क वूड खेळणार की नाही असा संभ्रम निर्माण झाला होता. वेगवान गोलंदाज मार्क वूड आणि स्फोटक फलंदाज डेविड मलान हे दोघेही भारताविरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही, असे समोर येत आहे.
इंग्लंड या स्पर्धेतील शेवटचा साखळी सामना श्रीलंकेविरुद्ध खेळला. या सामन्यात स्फोटक फलंदाज डेविड मलान (Dawid Malan) क्षेत्ररक्षण करताना दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे तो त्या सामन्यात फलंदाजी करण्यासही आला नाही. यानंतर वेगवान गोलंदाज मार्क वूड (Mark Wood) हा ऍडलेड ओव्हलमध्ये भारताविरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वीच्या सराव सत्रातून बाहेर झाला होता. माध्यमांतील वृत्तांनुसार, शरीरात त्रास होत असल्यामुळे त्याने सराव सत्रात भाग घेतला नाही. स्पर्धेतील सर्वात खतरनाक गोलंदाज वूड हा स्पर्धेतील सर्वात वेगवान गोलंदाज राहिला आहे आणि त्याने चार सामन्यात 9 विकेट्स घेतल्या.
उपांत्य सामन्यासाठी नाणेफेक झाली आणि इंग्लंडने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यावेळी इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने मार्क वूड आणि डेविड मलान खेळणार नाही हे सांगितले. हे दोघे बाहेर झाल्याने भारताची चिंता कमी झाली असे वाटत असताना बटलरने त्यांच्याजागी संघात ख्रिस जॉर्डन आणि फिल सॉल्ट यांना अंतिम अकरामध्ये जागा दिली. आता हे दोघे भारताची डोकेदुखी ठरणार का हे सामना झाल्यावरच कळेल.
दोन्ही संघांची टी20मधील एकमेकांविरोधातील आकडेवारी
आतापर्यंत या संघामध्ये 22 टी20 सामने खेळले गेले. यामध्ये भारत 12 सामने जिंकत आघाडीवर आहे, तर इंग्लंडने 10 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर भारताचा कर्णधार रोहित शर्मा, केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी इंग्लंड विरुद्ध टी20मध्ये शतकी खेळी केल्या आहेत.
आयसीसी स्पर्धांमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड
भारत-इंग्लंड संघ 2013च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आता बाद फेरीत समोरा-समोर येत आहेत. त्याचबरोबर हे दोन्ही संघ टी20 विश्वचषकात तीन वेळा भिडले असून भारत 2-1ने आघाडीवर आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हे नाही पाहिलं तर काय पाहिलं! पाकिस्तानच्या विजयानंतर आफ्रिदीचे सुटले नियंत्रण, केले ‘असे’ काही कृत्य
उपांत्य सामना जिंकल्यानंतर बाबरने मानले चाहत्यांचे आभार; म्हणाला, ‘याठिकाणी खेळताना…’