---Advertisement---

उपांत्य सामना जिंकल्यानंतर बाबरने मानले चाहत्यांचे आभार; म्हणाला, ‘याठिकाणी खेळताना…’

On: गुरूवार, नोव्हेंबर 10, 2022 12:18 PM
Babar-Azam
---Advertisement---

टी-20 विश्वचषक 2022  मध्ये अनेक सामन्यांचे निकाल आश्चर्यकारक राहिले. पाकिस्तान संघ उपांत्य सामन्यात पोहचण्याच्या आसा जवळपास मावळल्या होत्या. मात्र, त्यांनी उपांत्य सामना खेळला आणि जिंकला देखील. न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात पाकिस्तानने 7 विकेट्स राखून विजय मिळवला आणि अंतिम सामन्यात धडक दिली. हा विजय मिळवल्यानंतर त्यांचा कर्णधार बाबर आझम आनंदात होता. त्याने माध्यमांशी बोलताना खास प्रतिक्रिया देखील दिली.

पाकिस्तानच्या डावाची सुरुवात करण्यासाठी आलेला कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आणि यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) यांनी या सामन्यात 105 धावांची भागीदारी केली. दोघांनी वैयक्तिक अर्धशतके करत संघाला सुरुवातीच्या षटकांमध्ये चांगली लय मिळवून दिला आणि विजयात त्यांचे योगदान सर्वात महत्वाचे राहिले. बाबरने 42 चेंडूत 53 धावा केल्या, तर रिझवानने 43 चेंडूत 57 धावा कुटल्या. रिजवान उपांत्य सामन्यात केलेल्या महत्वाच्या धावांमुळे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. अंतिम सामन्याचे तिकिट पक्के झाल्यानंतर बाबर आझमने आनंद व्यक्त केला आणि मैदानात उपस्थित चाहत्यांचेही आभार मानले.

सामना संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना बाबर आझम म्हणाला, “समर्थकांचे धन्यवाद. त्यांच्यामुळे आम्ही घरच्या मैदानात खेळत असल्यासारखे वाटत होते. पहिल्या सहा षटकांमध्ये आम्हाला चांगली सुरुवात मिळाली. परंतु नंतर चेंडू व्यवस्थित आला नाही. वेगवान गोलंदाजांनी याठिकाणी चांगले प्रदर्शन केले. आम्ही (रिझवान आणि बाबर) मैदानात जाण्याआधीच नियोजन केले होते की, आम्ही पावरप्लेचा उपयोग करून घेऊ.”

बाबर आणि रिझवानव्यतिरिक्त या सामन्यात मोहम्मद हारिस (Mohammad Haris) यानेही पाकिस्तानसाठी महत्वाच्या 30 धावा केल्या. या खेळीसाठी बाबर त्याचे कौतुक करत म्हणाला की, “तो एक युवा खेळाडू आहे आणि स्वतःची आक्रमता दाखवत आहे. तो खूप चांगला खेळत आहे. आम्ही या क्षमाचा आनंद घेत आहोत, पण सोबतच अंतिम सामन्यावर आमचे लक्ष आहे.”

दरम्यान, पाकिस्तान अंतिम सामन्यात पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. गुरुवारी भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या उपांत्य सामन्यात जो संघ विजय मिळवेल, तो अंतिम सामन्यात पाकिस्तानसोबत खेळेल. (t20 world cup 2022 babar azam statement after reach to final)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: पाकिस्तान जिंकल्याने शोएब मलिक-वकार युनूसने स्टुडिओतच धरला ठेका, व्हिडिओ होतोयं व्हायरल
उपांत्य सामन्यासाठी इंग्लंड-भारत संघाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन; सोबत पीच, वेदर रिपोर्टचीही माहिती  

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---