भारत आणि इंग्लंडच्या संघामध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. तसेच मालिकेत भारतीय संघाने 2-1 ने आघाडी घेतली आहे. तसेच भारतीय संघात अनेक संधी न मिळाल्याने आणखी एका खेळाडूने निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने 2016 मध्ये माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पण तो भारतासाठी फक्त 1 वनडे सामना खेळण्यात यशस्वी ठरला होता. चला मग जाणून घेऊया कोण आहे तो खेळाडू.
38 वर्षीय फैज फजलने सोशल मीडियाच्या माध्यमातून निवृत्तीची घोषणा केली. तसेच फैज फजलने आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटला अलविदा केला आहे. फैज फझलची फर्स्ट क्लास आणि लिस्ट-एची कारकीर्द खूपच चमकदार आहे. तसेच फैज फझलच्या नेतृत्वाखाली विदर्भाने पहिले रणजी विजेतेपद देखील पटकावले होते. तसेच सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करताना त्याने लिहिले आहे की, भारत आणि विदर्भाचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मी नागपूरच्या त्याच मैदानावर पाऊल ठेवणार आहे जिथून 21 वर्षांपूर्वी मी माझे प्रथम श्रेणी क्रिकेट सुरू केले होते.
#Nagpur – 38-year-old former #Vidarbha skipper Faiz Fazal announces retirement from professional cricket.
Last inning of Faiz Fazal in Ranji Trophy. @BCCI @BCCIdomestic #RanjiTrophy pic.twitter.com/wPZAbM0TKV
— Praveen Mudholkar (@JournoMudholkar) February 18, 2024
याबरोबरच, फैज फझलने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, मी मैदानावर केलेल्या आठवणी मी नेहमी जपत राहीन. तर मी 24 नंबरची जर्सी देखील खूप मिस करेल. तसेच फैजने शेवटचा रणजी सामना हरियाणाविरुद्ध खेळला होता. ज्यामध्ये त्यांच्या सहकारी खेळाडूंनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला होता. मात्र, अखेरच्या डावात तो फारसा प्रभाव पाडू शकला नाही. शेवटच्या प्रथम श्रेणी डावात तो खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.
Leader. Legend. Stalwart. Happy retirement @faizfazal. Forever grateful for all the glory you've brought to Vidarbha cricket 🙏👑 pic.twitter.com/1ofMfL22d6
— Mayank (@ImMayankB) February 18, 2024
दरम्यान, फैज फजलने 2016 मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध भारताकडून वनडे पदार्पण केले होते. ज्यामध्ये त्याने सलामीला फलंदाजी करत अर्धशतक झळकावले होते. तसेच केएल राहुलसोबत डावाची सुरुवात करताना त्याने 61 चेंडूत 55 धावांची उत्कृष्ट खेळी केली होती. मात्र त्यानंतर त्याला पुन्हा भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली नाही. याबरोबरच फैजचा रेकॉर्ड प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगला आहे. त्याने 137 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 9183 धावा केल्या असून फैजने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 24 शतके आणि 39 अर्धशतकेही केली आहेत. त्याने 113 लिस्ट-ए सामन्यांमध्ये 3641 धावा केल्या. ज्यामध्ये त्याने 10 शतके आणि 22 अर्धशतके झळकावली आहेत.
Faiz Fazal has announced retirement from cricket
Today will be his last day in cricket
Under his captaincy Vidarbha won back to back Ranji Trophy and Irani Trophy
Also represented India in an ODI
Thank you Faiz Fazal— Abhas Kunde (@K945Abhas) February 19, 2024
महत्वाच्या बातम्या –
- जडेजाने ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा पुरस्कार केला पत्नीला समर्पित, अन् वडिलांनी लावला होता रिवाबावर जादूटोण्याचा आरोप
- यशस्वीला अनिल कुंबळेने दिला कानमंत्र? म्हणाला, जा अन् रोहित शर्माला सांग…