अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात बुधवारपासून(२४ फेब्रुवारी) दिवस-रात्र कसोटी सामना सुरु होत आहे. हा सामना कसोटी मालिकेतील तिसरा सामना आहे. हा सामना अहमदाबादच्या पुर्नबांधणी केलेल्या मोटेरा स्टेडियमवर होणार आहे. या पुर्नबांधणी करण्यात आलेल्या मोटेरा स्टेडियमचे नाव बदलण्यात आले असून या स्टेडियमचे नवीन नाव भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावरुन ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ ठेवण्यात आले आहे.
पुर्नबांधणी करण्यात आलेले हे स्टेडियम जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. ६३ एकरमध्ये बांधलेल्या या स्टेडियमची आसन क्षमता १ लाख १० हजार आहे. या स्टेडियमचे नाव सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम असे नाव होते. पण आता ते बदलण्यात आले आहे. असे असले तरी या स्टेडियममधील अन्य सुविधांचा भाग हा सरदार पटेल एन्क्लेव्ह या नावानेच ओळखला जाईल.
राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन
या स्टेडियमचे उद्घाटन भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. यावेळी गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शहा, क्रीडामंत्री किरण रिजिजू, आदी मान्यवर देखील उद्घाटन कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
या सुविधा आहेत स्टेडियममध्ये
या नवीन स्टेडियममध्ये ७६ कॉर्पोरेट बॉक्स आहेत. यातील प्रत्येक बॉक्समध्ये २५ जणांची आसन क्षमता आहे. तसेच ५५ खोल्या असलेले क्लब हाऊसदेखील आहे. तसेच त्यात एक जीम आणि ऑलिंपिक साईज स्विमिंग पूल देखील आहे. त्याचबरोबर या स्टेडियममध्ये ३ प्रॅक्टीस ग्राउंड, १ इनडोअर क्रिकेट ऍकेडमीचीही सुविधा आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
डे-नाईट टेस्टमध्ये भारताची आतापर्यंत कामगिरी कशी? पाहा एका क्लिकवर
इंग्लंडविरुद्ध दिवस-रात्र कसोटी सामना जिंकू शकतो भारतीय संघ, ‘ही’ आहेत ३ कारणे