---Advertisement---

न्यूझीलंड विरुद्ध भारतीय संघात मोठा बदल, टॉस नंतर काय म्हणाला कर्णधार रोहित शर्मा ?

On: रविवार, मार्च 2, 2025 3:10 PM
---Advertisement---

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील अ गटातील आज शेवटचा सामना भारत आणि न्यूझीलंड संघात दुबईमध्ये खेळला जात आहे. न्यूझीलंड संघाचा कर्णधार मिचेल सेंटनर याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार भारतीय संघ स्पर्धेमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करणार आहे. या आधीच्या दोन्ही सामन्यात भारतीय संघाने बांगलादेश आणि पाकिस्तान विरुद्ध धावांचा पाठलाग केला होता.

न्यूझीलंड विरुद्ध आजच्या सामन्यात भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे. भारतीय संघाच्या प्लेइंग 11 मध्ये वेगवान गोलंदाज हर्षित राणाच्या जागी फिरकीपटू वरून चक्रवर्तीला संघात स्थान देण्यात आले आहे. स्पर्धेमध्ये आज पहिल्यांदा वरूण चक्रवर्ती खेळताना दिसणार आहे.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, आम्ही पहिल्यांदा फलंदाजी करू. आम्ही प्रथम फलंदाजी करून नंतर पुढचा विचार करु. या सामन्यासाठी आमचे निर्णय आधीसारखे असतील. आम्ही आमच्या निर्णयात बदल करणार नाही. आमच्या संघाच्या प्लेइंग 11 मध्ये एक बदल करण्यात आला आहे. हर्षित राणाच्या जागी फिरकीपटू वरूण चक्रवर्ती खेळणार आहे. जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता तेव्हा हा पूर्ण भागीदारीचा खेळ आहे. मागच्या दोन्ही सामन्या दरम्यान आम्ही 19 विकेट्स घेतल्या आहेत. आमच्या संघाच्या फिरकीपटूंनी विरोधी फलंदाजांना धावा करण्यापासून रोखले. तसेच वेगवान गोलंदाजांनी फलंदाजांना बाद केले.

भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि वरूण चक्रवर्ती.

न्यूझीलंड संघाची प्लेइंग इलेव्हन

विल यंग, रचिन रविंद्र, केन विलियम्सन, डेरिल मीशेल, टॉम लैथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सेंटनर (कर्णधार), मैट हेनरी,

भारत आणि न्यूझीलंड संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. हा सामना खेळून दोन्ही संघ अ गटात वरच्या स्थानी पोहोचण्याचा प्रयत्न करतील. आतापर्यंत या स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंडने पाकिस्तान शिवाय बांगलादेश ला पराभूत केले आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश संघ स्पर्धेच्या बाहेर पडले आहेत.

हेही वाचा 

“दुबईमध्ये भारताचा वरचष्मा?” – कीवी ऑलराउंडरचे मोठे वक्तव्य!

विदर्भ संघाने रणजी ट्रॉफी उंचावली, तिसऱ्यांदा जेतेपदावर कोरलं नाव..!

“अंतिम सामन्यात भारत ऑस्ट्रेलियाला हरवणार…”, माजी क्रिकेटपटूचा मोठा दावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---