दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर डीन एल्गर याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. भारताविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी एल्गरने ही घोषणा केली होती. केपटाऊन कसोटी हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना होता. मात्र, दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक शुक्री कॉनरॅड यांना एल्गरला संघात ठेवायचे नव्हते, असा दावा करण्यात येत आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, मालिकेनंतर निवृत्ती घेण्याचा एल्गरचा कोणताही विचार नव्हता.
डीन एल्गर (Dean Elgar) याचा संघात समावेश करण्यास प्रशिक्षक तयार नव्हते. यानंतर त्याने प्रशिक्षक शुक्री यांना एक विनंती केली. यामध्ये एल्गर म्हणाला की, त्याला घरच्या चाहत्यांसमोर शेवटची मालिका खेळण्याची संधी मिळेल का? भारताविरुद्धच्या मालिकेत खेळल्यानंतर एल्गरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. शुक्री कॉनरॅड प्रशिक्षक झाल्यानंतर एल्गरला कर्णधारपद सोडावे लागले होते.
एल्गार चांगला फॉर्मात होता. दक्षिण आफ्रिकेतील चार दिवसांच्या मालिकेत दोन शतकांसह त्याची सरासरी 60 पेक्षा जास्त होती. पहिल्या कसोटीतही त्याने शानदार 185 धावा केल्या, ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेला डावाने विजय मिळवता आला. पहिल्या कसोटीत टेंबा बावुमा याला दुखापत झाल्यानंतर एल्गरने अखेरच्या कसोटीतही संघाचे नेतृत्व केले. मात्र, दुसऱ्या कसोटीत त्याला कमी धावा करता आल्या आणि भारताने दोन दिवसांतच सात विकेट्सने विजय मिळवून मालिका बरोबरीत आणली.
वृत्तपत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एल्गरने आपल्या निर्णयावर फेरविचार करावा, अशी काही वरिष्ठ खेळाडूंची इच्छा होती. पण या वागण्याने तो नाराज झाला होता आणि निवृत्तीच्या निर्णयावर ठाम राहिला. शुक्रवारी (12 जानेवारी) त्याने इंग्लिश काउंटी क्लब एसेक्ससोबत तीन वर्षांचा करार केला आहे. (Big excitement in Africa cricket Dean Elgar did not want to retire the coach had to take the decision)
हेही वाचा
आफ्रिकेने विश्वचषकासाठी केली नव्या कर्णधाराची घोषणा, ‘या’ अष्टपैलू खेळाडूकडे दिली जबाबदारी
IND vs AFG: यशस्वी जयस्वालने सांगितले यशाचे रहस्य; म्हणाला, ‘जेव्हाही मी विराट…’