क्रिकेटविश्वात एका पाठोपाठ एक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अशात आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. आयर्लंड संघाचा कर्णधार अँड्र्यू बालबर्नी याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे, वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत पात्र न ठरल्याच्या एक आठवड्यानंतर मर्यादित षटकांचा कर्णधार असलेल्या बालबर्नीने राजीनामा दिला आहे. याची माहिती आयर्लंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरून दिली आहे. बालबर्नीच्या या निर्णयामुळे क्रिकेटविश्वात खळबळ माजली आहे.
काय म्हणाला बालबर्नी?
मंगळवारी (दि. 04 जुलै) अँड्र्यू बालबर्नी (Andrew Balbirnie) याने क्रिकेट आयर्लंड बोर्डाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले की, “खूप विचार केल्यानंतर मी वनडे आणि टी20 संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही वर्षांमध्ये या संघाचे नेतृत्वा करणे माझ्यासाठी मोठ्या सन्मानापैकी राहिला आहे. मी अनेक खेळाडू, प्रशिक्षक, क्रिकेट आयर्लंड आणि आयर्लंड संघाच्या समर्थकांकडून मैदानावर आणि बाहेर मिळालेल्या पाठिंब्यासाठी आभारी आहे.”
???? BREAKING NEWS
Andrew Balbirnie steps down from white-ball captaincy with immediate effect, Paul Stirling has been named interim captain.
Read more: https://t.co/pvjsyyEDdv#BackingGreen ☘️???? pic.twitter.com/HjJoJCwKXd
— Cricket Ireland (@cricketireland) July 4, 2023
पॉल स्टर्लिंग प्रभारी कर्णधार
बालबर्नी पुढे बोलताना म्हणाला की, “मला वाटते की, ही माझ्यासाठी योग्य वेळ आहे, पण यापेक्षा जास्त महत्त्वाचे संघासाठी आहे. मी या संघासाठी आपले सर्वोत्तम प्रदर्शन देणे कायम ठेवेल आणि यामध्ये योगदान देण्यासाठी भरपूर मेहनत घेईल.” बालबर्नी याने कर्णधारपद सोडल्यामुळे पॉल स्टर्लिंग (Paul Stirling) हा प्रभारी कर्णधारपद सांभाळणार असल्याचेही बोर्डाने सांगितले आहे. तसेच, बालबर्नी हा निवडीसाठी उपस्थित राहील. (big news andrew balbirnie steps down as ireland odi and t20i captain know here)
किती सामन्यात केले नेतृत्व?
अँड्र्यू बालबर्नी 32 वर्षीय असून त्याने 2019च्या अखेरीस आयर्लंड संघाच्या कर्णधारपदाची धुरा हातात घेतली होती. त्याने सर्व क्रिकेट प्रकारात मिळून आतापर्यंत एकूण 89 सामन्यात संघाचे नेतृत्व केले आहे. त्याने कर्णधार म्हणून 4 कसोटी, 33 वनडे आणि 52 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
‘आताचे खेळाडू फक्त पैशासाठी…’, वेस्ट इंडिजला विश्वचषकातून बाहेर पडताना पाहून हळहळले चॅम्पियन खेळाडू
Big Breaking : अजित आगरकरची वरिष्ठ पुरुष निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड, बीसीसीआयने दिली माहिती