आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचे साखळी सामने संपले आहेत. स्पर्धेत काही संघांनी खूपच खराब प्रदर्शन केले. त्यात श्रीलंका क्रिकेट संघाचाही समावेश आहे. श्रीलंकेने 9 सामन्यांपैकी फक्त 2 सामने जिंकले. तसेच, 7 सामन्यांत पराभव पत्करला. यामुळे फक्त 4 गुणांसह ते पॉईंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानी राहिले. श्रीलंकेने जे दोन सामने जिंकले, त्यात अफगाणिस्तान आणि नेदरलँड्स संघाविरुद्धच्या सामन्यांचा समावेश होता. अलीकडेच आयसीसीने श्रीलंका क्रिकेट बोर्ड निलंबित केले होते. त्यानंतर आता श्रीलंकेचे माजी विश्वविजेते कर्णधार अर्जुन रणतुंगा संतापले आहेत. त्यांनी यामागे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांचा हात असल्याचे म्हणत गंभीर आरोप केला आहे.
काय म्हणाले रणतुंगा?
अर्जुन रणतुंगा (Arjuna Ranatunga) यांनी बीसीसीआयचे सचिव जय शाह (BCCI Secretary Jay Shah) यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. त्यांनी आरोप करत दावा केला आहे की, श्रीलंका क्रिकेट बोर्ड सध्या ज्या संकटांचा सामना करत आहे, त्यासाठी जबाबदार जय शाह आहेत. त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले, “श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अधिकारी आणि जय शाह यांच्यातील संबंधांमुळे बीसीसीआय या विचारात आहे की, ते श्रीलंका क्रिकेट बोर्डावर नियंत्रण मिळवू शकतात.”
विश्वचषक 1996 विजेत्या श्रीलंका संघाचे माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा पुढे बोलताना ते म्हणाले की, “जय शाह श्रीलंका क्रिकेट चालवत आहेत. जय शाह यांच्या दबावामुळे श्रीलंका क्रिकेट बर्बाद होत आहे. भारतात एक व्यक्ती श्रीलंका क्रिकेट बर्बाद करत आहे. ते फक्त आपल्या वडिलांमुळे शक्तिशाली आहेत, जे भारताचे गृहमंत्री आहेत.”
Arjuna Ranatunga Said," Sri Lanka Cricket being ruined because of pressure from Jay Shah. He is only powerful because of his father, who is India's home Minister".#BJP pic.twitter.com/cd4Ef0s8DX
— Mr Uzi (@Mr_Uziii) November 13, 2023
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा भाग नाही श्रीलंका
श्रीलंकेने पॉईंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानी राहून स्पर्धेचा शेवट केला. त्यामुळे त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचा भाग बनता आले नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये क्वालिफाय होण्याच्या नियमानुसार, जो संघ विश्वचषक 2023 स्पर्धेच्या पॉईंट्स टेबलमध्ये 8व्या स्थानाच्या खाली राहील, त्याला स्पर्धेसाठी क्वालिफाय करता येणार नाही.
उपांत्य सामन्याविषयी थोडक्यात
विश्वचषक 2023 स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) संघात 15 नोव्हेंबर रोजी वानखेडे स्टेडिअममध्ये होणार आहे. तसेच, दुसरा उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया (SA vs AUS) संघात 16 नोव्हेंबर रोजी इडन गार्डन्स मैदानावर खेळला जाईल. (big news arjuna ranatunga made serious allegations against bcci secretary jai shah said this)
हेही वाचा-
न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवण्यासाठी भारताला सर्वाधिक गरज कशाची? प्रमुख खेळाडूने सांगूनच टाकले; म्हणाला…
‘पाकिस्तान क्रिकेटची आई-बहीण…’, वर्ल्डकपमधील खराब प्रदर्शनानंतर रमीज राजांच्या तळपायाची आग मस्तकात