Sridharan Sriram As Technical Consultant : वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा अवघ्या 13 दिवसांवर येऊन ठेपली आहे. या स्पर्धेसाठी 7 संघांनी आपले स्क्वॉड घोषित केले आहे. तसेच, 3 संघ अजूनही स्क्वॉड घोषित करण्याचे बाकी आहेत. त्यात बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तानचा समावेश आहे. बांगलादेश संघ वनडे विश्वचषकातील आपला पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध 7 ऑक्टोबर रोजी खेळणार आहे. आता या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच बांगलादेश संघाने भारताच्या माजी खेळाडूला आपल्या ताफ्यात सामील केले आहे. या खेळाडूकडे टेक्निकल सल्लागाराची भूमिका सोपवली आहे.
कोण आहे तो भारतीय?
येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेला सुरुवात होत आहे. यासाठी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (Bangladesh Cricket Board) माजी टी20 प्रशिक्षक श्रीधरन श्रीराम (Sridharan Sriram) यांना राष्ट्रीय क्रिकेट संघाचे टेक्निकल सल्लागार म्हणून नेमले आहे. बांगलादेश संघाचे संचालक खालिद महमदू यांनी याची पुष्टी केली आहे. श्रीराम संघासोबत गुवाहाटी येथे 27 सप्टेंबरपासून जोडले जातील, जिथे बांगलादेश संघाला विश्वचषकापूर्वी 2 वॉर्म-अप सामने खेळायचे आहेत.
🚨 BREAKING: Sridharan Sriram is back!
Sriram is joining Bangladesh team again as the technical director only for 2023 World Cup in India. pic.twitter.com/swrPDzQr5H
— Saif Ahmed 🇧🇩 (@saifahmed75) September 21, 2023
अनुभवी श्रीधरन श्रीराम
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने मागील वर्षीही टी20 विश्वचषकापूर्वी श्रीधरन श्रीराम यांना टेक्निकल सल्लागार म्हणून नेमले होते. श्रीराम यांनी 6 वर्षे ऑस्ट्रेलिया संघाच्या फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका बजावली आहे. टी20 विश्वचषकानंतर ते बांगलादेश संघापासून वेगळे झाले होते. जेव्हा बांगलादेश कसोटी आणि वनडे संघाचे प्रशिक्षक रसेल डोमिंगो यांन त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर श्रीराम यांना प्रशिक्षक बनवण्याविषयी चर्चा होत्या, पण प्रशिक्षकपदाची जबाबदारी चंडिका हथुरुसिंघा यांना मिळाली. त्यांना सर्व क्रिकेट प्रकारातील मुख्य बनवले गेले होते. आता श्रीराम यांचे टेक्निकल सल्लागार म्हणून पुनरागमन झाले आहे. ते आयपीएल स्पर्धेत लखनऊ सुपर जायंट्स संघाचेही प्रशिक्षक आहेत आणि त्यांच्याकडे दीर्घ अनुभव आहे.
शाकिब अल हसन मोठा चाहता
बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) हा श्रीधरन श्रीराम यांचा खूप मोठा चाहता राहिला आहे. त्याने टी20 विश्वचषकात त्यांचे खूप समर्थन केले होते. तसेच, नजमूल होसेन याच्या यशामागेही श्रीराम यांचा हात असल्याचे बोलले जाते. अशात श्रीराम यांचे विश्वचषकापूर्वी बांगलादेशशी जोडणे संघासाठी फायद्याचे ठरू शकते. बांगलादेश संघाने एकदाही विश्वचषक जिंकला नाहीये. संघ वनडे विश्वचषक 2015मध्ये उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला होता. (big news bangladesh appoint sridharan sriram as technical consultant for odi world cup 2023 cricket team 2023)
हेही वाचाच-
‘मलाही एकदा तरी…’, विश्वचषकात खेळण्याविषयी शुबमनची मन जिंकणारी प्रतिक्रिया, तुम्ही वाचली का?
IND vs AUS : संभावित Playing XI ते खेळपट्टी आणि हवामान, पहिल्या वनडेची खडानखडा माहिती एकाच क्लिकवर