भारतीय खेळाडू चीन येथे खेळल्या जात असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2023मधील वेगवेगळ्या खेळांमध्ये जबरदस्त कामगिरी करताना दिसत आहेत. अलीकडेच भारतीय महिला क्रिकेट संघाने स्पर्धेत टी20 क्रिकेटच्या अंतिम सामन्यात श्रीलंका संघाचा धुव्वा उडवत सुवर्ण पदक जिंकले होते. अशात भारतीय खेळाडूंनी आणखी एक सुवर्ण कामगिरी केली आहे. या खेळात भारतीय नेमबाज सिफ्त कौर सामरा हिने 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात सुवर्ण पदक पटकावले.
सिफ्त कौर सामरा (Sift Kaur Samra) हिने विश्वविक्रम करत सुवर्ण पदक (Gold Medal) आपल्या नावावर केले आहे. तिने अंतिम सामन्यात 469.6 गुण मिळवले. यासोबतच तिने ब्रिटनच्या सियोनेड मॅकिन्टोश हिचा 467.0 गुणांच विश्वविक्रम मोडीत काढला.
मनू भाकरचीही 25 मीटर नेमबाजीत ‘सुवर्ण’ कामगिरी
सिफ्त हिच्याव्यतिरिक्त भारताच्या इतर खेळाडूही नेमबाजी खेळात चमकल्या. भारताकडून 25 मीटर पिस्तुल सांघिक स्पर्धेत मनू भाकर, ईशा सिंग आणि रिदम सांगवान यांनीही भाग घेतला होता. या तिघींकडून या खेळात खूप अपेक्षा होत्या. या तिघींनीही कुणालाच निराश केले नाही. मनू भाकर (Manu Bhakar), ईशा आणि रिदमनेही सुवर्ण पदक मिळवले.
सचिन तेंडुलकरकडून कौतुक
सिफ्त कौरसह इतर भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हादेखील खुश झाला. त्याने ट्वीट (एक्स) करत त्याचे कौतुक केले. तो म्हणाला, “भारताच्या शूटिंग स्टार्सची चमकदार कामगिरी. सिफ्त कौर सामराने विक्रम मोडून सुवर्णपदक पटकावले, तर मनू भाकर, रिदम सांगवान आणि ईशा सिंग यांच्या त्रिकूटाने भारताच्या टोपीत आणखी एक सोनेरी पंख जोडला.”
𝗦𝗵𝗼𝗼𝘁𝗶𝗻𝗴 𝘀𝘁𝗮𝗿𝘀 𝗼𝗳 𝗜𝗻𝗱𝗶𝗮 𝘀𝗵𝗶𝗻𝗲 𝗯𝗿𝗶𝗴𝗵𝘁!
🥇🌟Sift Kaur Samra breaks records, clinching GOLD, while the trio – Manu Bhaker, Rhythm Sangwan & Esha Singh add another golden feather to India's cap at #AsianGames!🇮🇳 pic.twitter.com/k6atiBlTwU
— Sachin Tendulkar (@sachin_rt) September 27, 2023
सिफ्त 50 मीटर एअर रायफलमध्येही जिंकले रौप्य
याव्यतिरिक्त सिफ्त, आशी चौकसे आणि मानिनी कौशिक यांनी सांघिक खेळात शानदार प्रदर्शन केले. या तिघींनी 50 मीटर रायफल 3 प्रकारात रौप्य पदक जिंकले. त्यांनी पात्रता फेरीत एकूण 1764 गुण मिळवले. (big news for india asian games 2023 indian shooter sift kaur samra won gold medal breaks world record read here)
हेही वाचा-
मिचेल मार्श आणि शतकामध्ये भिंत बनला कुलदीप! सलामीवीर फलंदाज ‘नर्व्हस नाईंटी’वर बाद
‘कुठल्याच खेळाडूला ही मालिका खेळायची नाहीये…’, IND vs AUS सीरिजबद्दल माजी खेळाडूचे धक्कादायक विधान