आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मधून 140 कोटी भारतीयांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. भारतीय हॉकी संघाने आपल्या पहिल्याच सामन्यात रविवारी (दि. 24 सप्टेंबर) दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने उझबेकिस्तान संघाविरुद्ध सर्वाधिक 16 गोल केले, पण विरोधी संघाला एकही गोल करू दिला नाही. अशाप्रकारे भारताचा 16-0ने विजय झाला. भारताच्या या विजयात ललित उपाध्याय, वरुण कुमार आणि मनदीप सिंग यांच्या हॅट्रिकचाही समावेश होता.
टोकियो ऑलिम्पिक कांस्य पदक विजेत्या जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या भारतीय हॉकी संघाचा (Hockey Team India) हा अ गटातील सामना होता. उझबेकिस्तान संघ एफआयएच रँकिगमध्ये 66व्या स्थानी आहे. भारताकडून ललित उपाध्याय (सातव्या, 24व्या, 37व्या आणि 53व्या मिनिटाला), मनदीप सिंग (18व्या, 27व्या आणि 28व्या मिनिटाला) आणि वरुण कुमार (12व्या, 36व्या, 50व्या आणि 52व्या मिनिटाला) यांनी हॅट्रिक केली.
#TeamIndia 🇮🇳 breeze past Uzbekistan with 16 goals in the opening encounter of the 19th Asian Games Hangzhou 2022.
We march on! 🔥
Next Match:
📅 26th Sept 6:30 AM IST.
📍Hangzhou, China.
📺 Streaming on Sony LIV and Sony Sports Network.Image Credit: @19thAGofficial… pic.twitter.com/2gC8LZmbU0
— Hockey India (@TheHockeyIndia) September 24, 2023
अभिषेक (17व्या), सुखजीत सिंग (42व्या), शमशेर सिंग (43व्या), अमित रोहिदास (38व्या) आणि संजय (57व्या) यांनी गोल केले. भारताला आता 26 सप्टेंबर रोजी पुढील सामन्यात सिंगापूरविरुद्ध खेळायचे आहे. विशेष म्हणजे, या सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंग (Harmanpreet Singh) खेळला नाही. उद्घाटनाच्या समारंभात तो ऑलिम्पिक विजेती बॉक्सर लवलीना बोरगोहेन हिच्यासोबत भारतीय संघाचा ध्वजवाहक होता. त्यानंतर त्याला विश्रांती देण्यात आली होती.
खरं तर, भारताने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखत सातव्या मिनिटाला पहिला गोल केला होता. भारताला पूर्ण 60 मिनिटाच्या खेळात 14 पेनल्टी कॉर्नर मिळाले. त्यातील 5वर गोल करता आले. भारताच्या इतर खेळाडूंनी मिळून 10 गोल केले. तसेच, एक गोल पेनल्टी स्ट्रोकवर आला. भारताला पाचव्या मिनिटाला संधी मिळाली होती, पण अभिषेकच्या शॉटवर उझबेकिस्तानच्या गोलकीपरने बचाव केला. यानंतर सुखजीतने भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळवून दिला. मात्र, संजय त्याच्यावर गोल करू शकला नाही. ललितने रिबाऊंडवर गोल केला. वरुणने पेनल्टी कॉर्नरवर 12व्या मिनिटाला गोल करत भारताची आघाडी दुप्पट केली.
दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला भारताला मिळालेला पेनल्टी कॉर्नर व्यर्थ गेला. भारताचा तिसरा गोल 17व्या मिनिटाला मनदीपने दिलेल्या पासवर अभिषेकने गोल केला. मनदीपने ब्रेकपूर्वी एक मिनिटाच्या आत दोन गोल केले. भारताला तीन मिनिटात आणखी 2 पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण त्यावर गोल करता आले नाहीत. सामन्याच्या पहिल्या टप्प्यात (हाफ टाईम) भारताकडे 7-0ची आघाडी होती.
सामन्यात रोटेशनल गोलकीपिंग करणारे पीआर श्रीजेश आणि कृशन बहादूर पाठक फक्त प्रेक्षक बनून राहिले. कारण, उझबेकिस्तानचे खेळाडू आक्रमक खेळ दाखवू शकले नाहीत. भारताने अखेरच्या दोन क्वार्टरमध्ये आणखी 9 गोल केले. यातील 4 पेनल्टी कॉर्नर आणि 1 स्ट्रोकवर आला.
अशाप्रकारे भारताने आशियाई क्रीडा स्पर्धा 2023ची सुरुवात दिमाखात केली आहे. (Big News India beat Uzbekistan by 16-0 in their first match in the Asian Games in Hockey)
महत्त्वाच्या बातम्या-
फक्त खेळ बदलला! भारताकडून पाकिस्तानचा दारून पराभव
…तुम्ही क्रिकेटमधील धावांप्रमाणे हाॅकीत गोल करता! ब्रॅडमन अन् ध्यानचंद यांच्या भेटीचा रोमांचक किस्सा