सध्या क्रिकेटप्रेमी इंडियन प्रीमिअर लीग या टी20 स्पर्धेचा तुफान आनंद लुटत आहेत. या स्पर्धेनंतर क्रिकेटप्रेमींसाठी वनडे विश्वचषकाची मेजवाणीदेखील असणार आहे. वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा भारतातच होणार असून ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. क्रिकेटप्रेमी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी खूपच प्रतीक्षा करत आहेत. अशात वृत्त समोर येत आहे की, बीसीसीआय भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचे आयोजन अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे करणार आहे. आयपीएल 2023 संपल्यानंतर बीसीसीआय विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करू शकतं.
माध्यमांतील वृत्तांनुसार, बीसीसीआयने भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) संघातील सामन्याचे यजमानपद अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमकडे (Narendra Modi Stadium) सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. या क्रिकेट स्टेडिअममध्ये प्रेक्षकांच्या बसण्याची क्षमता जवळपास एक लाख आहे. वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेची सुरुवात 5 ऑक्टोबरपासून होऊ शकते. माध्यमांतील वृत्तांनुसार, पाकिस्तान संघाचे अधिकतर सामने सुरक्षा कारणांमुळे चेन्नई आणि बेंगलोर सामन्यात केले जाऊ शकतात. याव्यतिरिक्त कोलकाताच्या ईडन गार्डन्समध्येही पाकिस्तानचे सामने खेळले जाऊ शकतात.
पाकिस्तानव्यतिरिक्त बांगलादेशचे अधिकतर सामने कोलकाता आणि गुवाहाटी येथे होऊ सकतात. कारण, बांगलादेश क्रिकेट चाहत्यांना इतके जास्त अंतर पार करावे लागणार नाही. त्याव्यतिरिक्त जी माहिती समोर आली आहे, त्यानुसार, भारतीय संघाने बीसीसीआयकडे दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड संघातील सामन्यासाठी फिरकीला उपयुक्त असेल अशा खेळपट्टीची मागणी केली आहे. भारतीय संघाला संथ खेळपट्टीला महत्त्व द्यायचे आहे. जेणेककरून त्यांना त्याचा फायदा मिळेल.
2023 World Cup. [The Indian Express]
– Shortlisted venues are Ahmedabad, Nagpur, Bengaluru, Trivandrum, Mumbai, Delhi, Lucknow, Guwahati, Hyderabad, Kolkata, Rajkot, Indore, Bengaluru, Dharamshala, Chennai
– WC is set to start on October 5
– Ahmedabad likely to host IND vs PAK
— Johns. (@CricCrazyJohns) May 5, 2023
भारताच्या ‘या’ शहरांमध्ये होणार सामने
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी बीसीसीआयने 12 ठिकाणांची निवड केली आहे. त्यात नागपूर, बंगळुरू, त्रिवेंद्रम, मुंबई, नवी दिल्ली, लखनऊ, गुवाहाटी, हैदराबाद, कोलकाता, राजकोट, इंदोर आणि धरमशाला यांचा समावेश आहे. (big news india vs pakistan 2023 odi world cup match could play in narendra modi stadium ahmedabad)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीच्या आयपीएल खेळण्याबाबत माजी खेळाडूची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘आता तो फक्त एक…’
‘माझ्या हृदयाचे ठोके 200पर्यंत…’, शेवटच्या षटकात KKRच्या विजयाचा हिरो ठरलेल्या चक्रवर्तीचे मोठे भाष्य