इंडियन प्रीमिअर लीग 2024 स्पर्धेपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. आरसीबी संघाने आयपीएल 2024 स्पर्धेपूर्वी आपला मुख्य प्रशिक्षक निवडला आहे. आरसीबीने संजय बांगर यांच्या जागी अँडी फ्लॉवर यांना मुख्य प्रशिक्षक बनवले आहे. अँडी फ्लॉवर यांची आतापर्यंतची प्रशिक्षक कारकीर्द शानदार राहिली आहे. त्यांनी आयपीएलसोबतच पाकिस्तान सुपर लीग, इंटरनॅशनल लीग टी20, द हंड्रेड आणि अबू धाबी टी10 स्पर्धेतील संघांना प्रशिक्षण दिले आहे. आरसीबीने सोशल मीडियाद्वारे याची माहिती दिली आहे.
विशेष म्हणजे, संजय बांगर (Sanjay Bangar) यांचा आरसीबीसोबतचा करार संपला आहे. त्यांच्यासोबतच संचालक पद सांभाळणाऱ्या माईक हेसन (Mike Hesson) यांनीही संघाची साथ सोडली आहे. अशात आरसीबी (RCB) संघाने ट्विटरवरून याची माहिती दिली आहे. आरसीबीने ट्वीट करून सांगितले की, “टी20 विश्वचषक विजेते प्रशिक्षक आणि आयसीसी हॉल ऑफ फेम यांचे आरसीब पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे.”
We are beyond thrilled to welcome ???????????? ???????????????? ???????? ???????????????????? and ???????????? ???????????????????? ???????????? winning coach ???????????????? ???????????????????????? as the ???????????????? ???????????????????? of RCB Men’s team. ????????
Andy’s experience of coaching IPL & T20 teams around the world, and leading his teams to titles… pic.twitter.com/WsMYGCkcYT
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) August 4, 2023
ट्वीटमध्ये त्यांनी पुढे म्हटले की, “अँडी फ्लॉवर यांना आयपीएल आणि जगभरातील टी20 संघांना प्रशिक्षण देऊन पीएसएल, इंटरनॅशनल टी20, द हंड्रेड आणि अबू धाबी टी10 स्पर्धेत आपल्या संघांना विजय मिळवून देण्याचा अनुभवही आहे. अशात त्यांचा अनुभव स्पर्धा जिंकण्याची मानसिकता विकसित करण्यात आणि आरसीबीचे #प्लेबोल्ड तत्वज्ञान पुढे नेण्यात मदत करेल.”
झिम्बाब्वे संघाचे माजी दिग्गज खेळाडू राहिलेले अँडी फ्लॉवर यांनी आरसीबी संघापूर्वी आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाचा भाग होते. ते लखनऊ संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. फ्लॉवर यांची प्रशिक्षण कारकीर्द शानदार राहिली आहे. 2007मध्ये ते इंग्लंड क्रिकेट संघाचे सहाय्यक प्रशिक्षक बनले होते. त्यानंतर ते अनेक संघांसोबत जोडले गेले. फ्लॉवर हे पीएसएल स्पर्धेत पेशावर जालमी संघाचे फलंदाजी प्रशिक्षकही राहिले होते.
तसेच, मुल्तान सुल्तान संघाचे मुख्य प्रशिक्षकपदही त्यांनी भूषविले आहे. त्यांना आयपीएल स्पर्धेत पंजाब किंग्स संघाचा सहाय्यक प्रशिक्षक बनवले गेले होते. त्यानंतर 2021मध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाने त्यांच्यावर मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली होती. (big news ipl 2024 royal challengers bangalore andy flower new head coach replaced sanjay bangar read fast)
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! RCBला मिळाला नवीन प्रशिक्षक, जगातल्या प्रसिद्ध लीगमध्ये खणकलंय ‘या’ दिग्गजाचं नाणं
अर्रर्र! पराभवानंतर पंड्याच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद, यादीत धोनी आणि रहाणेचाही समावेश






