IPL Brand Value: इंडियन प्रीमिअर लीग 2024 स्पर्धेचा लिलाव सुरू होण्यासाठी अवघे 5 दिवस उरले आहेत. 19 डिसेंबर रोजी दुबईत आयपीएल 2024 लिलाव पार पडणार आहे. या लिलावासाठी 333 खेळाडूंनी आपले नाव नोंदवले आहेत, पण यातील फक्त 77 खेळाडूंवरच बोली लागणार आहे. लिलावात पुन्हा एकदा खेळाडूंवर फ्रँचायझींकडून कोट्यवधी रुपयांची बोली लागताना दिसेल. जगातील सर्वात श्रीमंत टी20 लीगमध्ये आयपीएलची गणना होते. मात्र, आयपीएल ब्रँड व्हॅल्यू नेमकी किती आहे, हे माहितीये का? नसेल, तर चला जाणून घेऊयात…
आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू
माध्यमांतील वृत्तांनुसार, इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएलच्या (IPL) एकूण ब्रँड व्हॅल्यूमध्ये आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेनंतर 28 टक्के वाढ झाली आहे. सध्या आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू 10.7 बिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास 89,236 कोटी रुपये इतकी आहे.
THE IPL HAS ACHIEVED THE DECACORN STATUS….!!!
– The brand value of IPL is currently 89,236cr. (TOI). pic.twitter.com/hi7lZ8uw1e
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 13, 2023
आयपीएलचा पहिला हंगाम सन 2008मध्ये खेळला होता. त्यानंतर सातत्याने आयपीएलच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये वाढ होताना दिसत आहे. आयपीएलच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये सातत्याने होत असलेल्या वाढीचे श्रेय स्टेडिअममधील प्रेक्षकांची प्रचंड संख्या, इंटरनेट आणि इतर माध्यमातून आयपीएल सामन्यांचा अधिक वापर, तसेच मेगा-मीडिया भागीदारींना जाते.
मुंबई इंडियन्स सर्वात महागडी फ्रँचायझी
आयपीएल (IPL) इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेली मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आयपीएलची सर्वात महागडी फ्रँचायझी आहे. मुंबईची ब्रँड व्हॅल्यू ही सध्या 725 कोटी रुपये आहे. पुन्हा एकदा मुंबई आयपीएल 2024 लिलावात (IPL 2024 Auction) खेळाडूंवर बोली लावण्यासाठी सज्ज आहे.
लिलावापूर्वी हार्दिक पंड्याच्या पुनरागमनामुळे मुंबईला आणखी मजबूती मिळाली आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली मुंबईने पाच वेळा आयपीएल किताब जिंकला आहे. मागील दोन हंगामापासून मुंबईचे प्रदर्शन खास राहिले नाहीये. अशात यावेळी संघ मागील दोन वर्षांची कसर काढण्याच्या इराद्याने उतरेल.
आयपीएल संघांची ब्रँड व्हॅल्यू
मुंबई इंडियन्स- 725 कोटी रुपये*
चेन्नई सुपर किंग्स- 675 कोटी रुपये
कोलकाता नाईट रायडर्स- 657 कोटी रुपये
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर- 582 कोटी रुपये (big news ipl currently the brand value ipl 2024 auction mumbai indians brand value)
हेही वाचा-
‘अभिमानाने सांगतो, मी मुस्लिम आहे…, मला कोण रोखणार?’, Sajda Controversyवर शमीचे मोठे विधान
INDvsSA 3rd T20: ‘करो या मरो’ सामन्यात खेळपट्टी कुणाच्या फायद्याची? पाऊस करणार का एन्ट्री? वाचा सगळं काही