क्रिकेटविश्वातून स्टार खेळाडूंच्या निवृत्तीच्या बातम्यांनी जोर धरला आहे. दोन दिवसांपूर्वी भारतीय खेळाडू मनोज तिवारी याने सर्व प्रकारच्या क्रिकेटला रामराम ठोकला होता. त्यानंतर शुक्रवारी (दि. 04 ऑगस्ट) दोन खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यातील पहिला खेळाडू म्हणजे इंग्लंडचा 2022 टी20 विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य ऍलेक्स हेल्स होय. तसेच, दुसरा खेळाडू म्हणजे नेपाळ संघाचा माजी कर्णधार ज्ञानेंद्र मल्ला होय.
नेपाळचा खेळाडू ज्ञानेंद्र मल्ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त (Gyanendra Malla retired from international cricket) झाला आहे. त्याने सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे. एकापाठोपाठ एक अशा निवृत्तीच्या बातम्या आल्याने क्रिकेट चाहत्यांनाही धक्का बसला आहे.
सोशल मीडियाद्वारे निवृत्तीची घोषणा
ज्ञानेंद्र मल्ला (Gyanendra Malla) याने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून निवृत्तीची घोषणा केली. त्याने ट्विटरवर निवेदनाद्वारे निवृत्तीची माहिती दिली. त्याने लिहिले की, “जड पण अत्यंत कृतज्ञ अंतःकरणाने, मला वाटते की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करण्याची हीच योग्य वेळ आहे. स्थानिक स्तरावर खेळण्यापासून ते राष्ट्रीय स्तरावर खेळण्यापर्यंत, मला या खेळातून खूप काही शिकलो.”
धन्यवाद। Thank you! 🙏 pic.twitter.com/IUqd9E5Idv
— Gyanendra Malla (@gyanu_gm11) August 4, 2023
त्याच्या या पोस्टवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकजण त्याला नेपाळच्या क्रिकेट सेवेसाठी धन्यवाद देत आहेत. तसेच, त्याच्या पुढील भविष्यासाठीही त्याला शुभेच्छा देत आहेत.
हेही वाचा- क्रीडा मंत्री झालेल्या भारतीय खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती
ज्ञानेंद्रची कारकीर्द
मल्ला याने 2014मध्ये नेपाळ क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्याने त्याच्या 9 वर्षांच्या कारकीर्दीत 37 वनडे आणि 45 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले. यादरम्यान 32 वर्षीय खेळाडूने वनडेत 7 अर्धशतकांच्या मदतीने 876 धावा केल्या. तसेच, टी20त त्याने 120.29च्या स्ट्राईक रेटने 1 शतक आणि 2 अर्धशतकांच्या मदतीने 883 धावा केल्या.
त्याच्या नेतृत्वाविषयी बोलायचं झालं, तर त्याने 10 वनडे सामन्यात संघाचे नेतृत्व केले. यामध्ये त्याला 6 सामन्यात विजय मिळवता आला. टी20त त्याने 12 सामन्यात नेतृत्व केले आणि 9 सामन्यात संघाला विजय मिळवून दिला. तो नेपाळसाठी वनडे सामन्यात अर्धशतक करणारा पहिला खेळाडू बनला होता. त्याने 2018मध्ये नेदरलँडविरुद्ध देशाच्या पहिल्या सामन्यात ही कामगिरी केली होती. त्याने 2006 आणि 2008मध्ये दोन 19 वर्षांखालील विश्वचषकातही नेपाळचे प्रतिनिधित्व केले होते. (big news nepal former captain gyanendra malla retires from international cricket read)
महत्त्वाच्या बातम्या-
डेब्यू गाजवल्यानंतर तिलकने सांगितले आपले स्वप्न, म्हणाला, “या निळ्या जर्सीमध्ये देशासाठी…”
बांगर बाबा की जय! आरसीबीने नारळ देताच ‘या’ संघाकडून आली ऑफर