इंडियन प्रीमिअर लीग 2024 स्पर्धेसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने संजय बांगर यांच्या जागी अँडी फ्लॉवर यांना मुख्य प्रशिक्षक बनवले. तसेच क्रिकेट हेड माईक हेसन यांना देखील नारळ दिला. मात्र, आरसीबीची साथ सोडल्यानंतर 24 तासांच्या आतच बांगर यांना दुसऱ्या संघाकडून मुख्य प्रशिक्षकपदाची ऑफर आल्याचे वृत्त समोर येत आहे.
आरसीबी संघ मागील तीन वर्षात दोन वेळा प्ले ऑफ्समध्ये पोहोचण्यात यशस्वी ठरला होता. मात्र, त्यांना अंतिम फेरीत प्रवेश करताना नाही. याच पार्श्वभूमीवर आगामी हंगामासाठी हेसन व बांगर यांच्याशी फारकत घेण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला. काही दिवसांपूर्वीच लखनऊ संघाशी करार संपलेल्या ऍण्डी फ्लॉवर यांना त्यांनी मुख्य प्रशिक्षक बनवले आहे. तर, हेसन यांच्या जागी योग्य व्यक्तीची निवड लवकरच केली जाईल असे सांगण्यात आले.
बांगर हे भारतीय संघाचे सहप्रशिक्षक या पदावरून दूर झाल्यानंतर 2021 मध्ये आरसीबीशी जोडले गेले होते. स्वतः विराट कोहली याच्या पुढाकाराने त्यांना हे पद मिळाले होते. मात्र, आता ते आरसीबीचा भाग नसतील.
आरसीबीशी फारकत घेतल्यानंतर बांगर यांना राजस्थान रॉयल्सकडून मुख्य प्रशिक्षक म्हणून प्रस्ताव आल्याचे सांगितले जात आहे. एका आघाडीच्या क्रीडा संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, राजस्थान संघ व्यवस्थापनाने बांगर यांना मुख्य प्रशिक्षक पदासाठी विचारणा केली आहे. ते कुमार संगकारा याच्या मार्गदर्शनाखाली काम करतील. संगकारा हे राजस्थान रॉयल्सचे हेड ऑफ क्रिकेट आहेत.
राजस्थान रॉयल्सने मागील दोन वर्षांपासून एकही मुख्य प्रशिक्षक नियुक्त केला नाही. पॅडी अप्टन यांच्यानंतर ट्रेवर पेनी हे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावत आहेत.
(Rajasthan Royals Offer To Sanjay Bangar As Head Coach In IPL 2024)
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाला आव्हान देण्यासाठी आयर्लंडने घोषित केला संघ, नेतृत्वातही बदल
टी20 वर्ल्डकप 2024 साठी उथप्पा ‘या’ खेळाडूला पाहतोय फिनिशर म्हणून, कारण देत म्हणाला…