क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. गुरुवारी (दि. 06 जुलै) नेदरलँड विरुद्ध स्कॉटलंड संघात आयसीसी वनडे विश्वचषक 2023 क्वालिफायर फेरीतील 8वा सुपर 6 सामना पार पडला. या सामन्यात नेदरलँडचा 4 विकेट्सने विजय झाला. यासोबतच नेदरलँड संघ वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी क्वालिफाय होणारा 10वा संघ बनला. या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या बास डी लीड याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
या सामन्यात नेदरलँड (Netherlands) संघाचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स (Scott Edwards) याने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. कर्णधाराचा हा निर्णय संपूर्ण संघाने योग्य ठरवला. यावेळी स्कॉटलंड (Scotland) संघाने फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 9 विकेट्स गमावत 277 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड संघाने 42.5 षटकात 6 विकेट्स गमावत 278 धावा केल्या आणि 4 विकेट्सने सामना खिशात घातला. यासह नेदरलँड संघ वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेसाठी क्वालिफाय झाला.
WHAT. A. GAME ????
Bas de Leede produces an all-round performance for the ages to take Netherlands to #CWC23 ????#SCOvNED: https://t.co/d9Ke8xmAoU pic.twitter.com/SqLzIofgMe
— ICC (@ICC) July 6, 2023
स्कॉटलंडच्या आव्हानाचा सामना करताना नेदरलँड्सकडून फलंदाजी करताना बास डी लीड (Bas De Leede) चमकला. त्याने 92 चेंडूत सर्वाधिक 123 धावांचा पाऊस पाडला. या धावा करताना त्याने 5 षटकार आणि 7 चौकारांचीही बरसात केली. त्याच्याव्यतिरिक्त सलामीवीर विक्रमजीत सिंग (40), साकिब झुल्फिकार (नाबाद 33), कर्णधार एडवर्ड्स (25) आणि मॅक्स ओ डौड (20) या फलंदाजांनी संघाच्या धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. त्यामुळे नेदरलँड संघाने 278 धावा करून आव्हान पार केले आणि विजय मिळवला.
यावेळी स्कॉटलंडकडून गोलंदाजी करताना मायकल लीस्क याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 8 षटकात 42 धावा खर्चून 2 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त ब्रेंडन मॅकमुलेन, मार्क वॅट आणि ख्रिस ग्रीव्हज यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडकडून ब्रेंडन मॅकमुलेन (Brandon McMullen) याने सर्वाधिक धावा चोपल्या. त्याने 110 चेंडूत 106 धावांची शतकी खेळी साकारली. त्याच्या या खेळीत 3 षटकार आणि 11 चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त कर्णधार रिची बेरिंग्टन (Richie Berrington) याने 64 धावा केल्या. तसेच, टॉमस मॅकिंटोश याने नाबाद 38 धावांचे योगदान दिले. सलामीवीर ख्रिस्तोफर मॅकब्राईड यानेही 32 धावा केल्या, तर ख्रिस ग्रीव्हज याने 18 धावा केल्या. इतर एकही फलंदाज खास कामगिरी करू शकला नाही.
यावेळी नेदरलँडकडून गोलंदाजी करताना बास डी लीड याने जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने 10 षटके गोलंदाजी करताना 52 धावा खर्च करत सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त रायन क्लीन याने 2, तर व्हॅन बीक याने 1 विकेट घेतली.
विशेष म्हणजे, नेदरलँड संघाचा वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेतील पहिला सामना 6 ऑक्टोबर रोजी हैदराबाद येथे पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. (Netherlands won by 4 wkts Against Scotland and qualify for icc odi world cup 2023)
महत्वाच्या बातम्या-
करिअरच्या 100व्या कसोटीत स्मिथ फेल! ब्रॉडच्या घातक चेंडूवर ऑसी दिग्गज स्वस्तात बाद
सामन्यातील असामान्य नेतृत्व! जबरदस्त आहे कसोटी, वनडे आणि टी-20 क्रिकेटमधील धोनीची आकडेवारी