INDvsPAK T20 World Cup 2024: पुढील वर्षी जूनमध्ये टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेचे आयोजन होणार आहे. हा विश्वचषक वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या भूमीत खेळला जाईल. मात्र, त्यापूर्वीच भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याविषयी मोठी बातमी समोर येत आहे. टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेसाठी एकूण 20 संघांनी क्वालिफाय केले आहे. या संघांना 5-5च्या चार गटात विभागले आहे. मात्र, स्पर्धेसाठी अद्याप ठिकाणांची अधिकृत घोषणा झाली नाहीये. मात्र, एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, भारत आणि पाकिस्तान संघातील सामना अमेरिकेत खेळला जाईल.
द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK) संघातील सामना न्यूयॉर्क (New York) शहरातील पॉप-अप स्टेडिअम (Pop-Up Stadium) येथे पार आयोजित केला जाणार आहे. या सामन्यासाठी अस्थानी स्टेडिअमचे निर्माण केले जाईल. यामध्ये 34 हजार प्रेक्षकांच्या बसण्याची क्षमता असेल. रिपोर्ट्सनुसार, आयसीसी आणि स्थानिक आयोजन समितीकडून याबाबतच्या करारावर स्वाक्षरी केली जाईल.
भारत आणि पाकिस्तानसह एकूण 10 संघ स्पर्धेतील साखळी फेरीतील आपले सुरुवातीचे सामने अमेरिकेत खेळतील. अमेरिकेला आशा आहे की, यादरम्यान प्रेक्षक मोठ्या संख्येने स्टेडिअममध्ये हजेरी लावतील.
रिपोर्ट्सनुसार, अद्याप वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे. मात्र, हे निश्चित मानले जात आहे की, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया साखळी फेरीतील त्यांचे सर्व सामने कॅरेबियनमध्ये खेळतील. रिपोर्ट्मध्ये असा दावा करण्यात आला आहे की, इंग्लंड साखळी फेरीतील त्यांचे सामने आणि जर संघ सुपर-8साठी पात्र ठरला, तर सुपर-8मधील सर्व सामने अँटिग्वा, बार्बाडोस आणि सेंट लुसिया येथे खेळेल.
#INDvsPAK X trending ko follow 🥳😍❤️#AUSvsPAK #AUSvPAK #ViratKohli𓃵 #CaptainMiller #PAKvAUS #HappyBirthdayTaylorSwift #MunAra #fcklive #RIPZahara #INDvSA #BreakingNews #BiggBoss7Tamil #BiggBoss17 #BiggBoss #MunawarFaruqui𓃵 #BiggBoss7Tamil pic.twitter.com/GQrQz6qhgS
— Rahul YADAV 🇮🇳 (@sen_divine40042) December 15, 2023
या स्पर्धेचा अंतिम सामना कुठे खेळला जाईल, हे अद्याप निश्चित झाले नाहीये. मात्र, असे म्हटले जात आहे की, स्पर्धेचा अंतिम सामना बार्बाडोस येथे खेळला जाईल. यापूर्वी याच मैदानावर 2007 सालचा वनडे विश्वचषकाचा अंतिम सामना आणि 2010मध्ये टी20 विश्वचषकातील सामना पार पडला होता. (big news new york will host india vs pakistan match of icc t20 world cup 2024)
हेही वाचा-
अर्रर्र! आगामी टी20 लीगमध्ये कुठल्याच संघाने विश्वास न दाखवल्याने पाकिस्तानी खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती
INDvsSA: वर्ल्डकपमधील फिल्डिंग मेडलचे कमबॅक, पण यावेळी दिसला नवा अंदाज; कोण बनला मानकरी? पाहा Video