क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज एहसान आदिल आणि अष्टपैलू हम्माद आझम यांनी निवृत्ती घेतली आहे. ही माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने रविवारी (दि. 09 जुलै) दिली आहे. आदिल आणि हम्मादच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीमुळे क्रिकेटविश्वात त्यांची चर्चा रंगली आहे.
विशेष म्हणजे, एहसान आदिल (Ehsan Adil) याने फेब्रुवारी 2013मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियनमध्ये कसोटी पदार्पण केले होते. तसेच, 2015पर्यंत 2 कसोटी आणि 6 वनडे सामने खेळले होते. या दोन्ही क्रिकेट प्रकारात त्याच्या नावावर अनुक्रमे 5 आणि 4 विकेट्सची नोंद आहे.
एहसानने 19 वर्षांखालील विश्वचषकात केलेला प्रवेश
पाकिस्तान संघाच्या वरिष्ठ संघात प्रवेश करण्यापूर्वी आदिल याने 2012मध्ये ऑस्ट्रेलियातील आयसीसी पुरुष 19 वर्षांखालील विश्वचषकात पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले होते. 30 वर्षीय आदिलच्या देशांतर्गत क्रिकेट कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने 67 प्रथम श्रेणी सामने खेळताना 3.11च्या इकॉनॉमी रेटने 245 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, अ दर्जाच्या 67 सामन्यात त्याने 5.32च्या इकॉनॉमी रेटने 98 विकेट्स घेतल्या होत्या. याव्यतिरिक्त 68 टी20 सामन्यात त्याने 8.14च्या इकॉनॉमी रेटने 86 विकेट्स नावावर केल्या होत्या.
Thank you for your services, Ehsan Adil and Hammad Azam! Wishing you both well for future endeavours.
Read more ➡️ https://t.co/Z4bBthUohx pic.twitter.com/LtjwriU20I
— Pakistan Cricket (@TheRealPCB) July 9, 2023
हम्मादने 2015मध्ये खेळलेला शेवटचा सामना
दुसरीकडे, 32 वर्षीय अष्टपैलू हम्माद आझम (Hammad Azam) याने न्यूझीलंडमध्ये झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषक 2010मध्ये पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्याने 2011 ते 2015दरम्यान 11 वनडे सामन्यात फलंदाजी करताना 80 धावा आणि गोलंदाजी करताना 2 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, 5 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात त्याला 34 धावा करता आल्या होत्या. त्याच्या देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्याने 107 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 4953 धावा आणि 186 विकेट्स घेतल्या होत्या. 114 अ दर्जाच्या सामन्यात त्याने 2362 धावा आणि 91 विकेट्स नावावर केल्या होत्या. याव्यतिरिक्त 98 टी20 सामन्यात 1361 धावा आणि 75 विकेट्स घेतल्या होत्या.
आता हे दोन्ही खेळाडू यावर्षीच्या मेजर लीग क्रिकेट (Major League Cricket) स्पर्धेत एमआय न्यूयॉर्क (MI New York) संघाकडून खेळताना दिसतील. (big news pakistan cricketer ehsan adil and hammad azam announce retirements)
महत्वाच्या बातम्या-
‘विराट FAB 4चा भाग नाही, बाबरचे नाव जोडा…’, माजी भारतीय क्रिकेटपटूचे खळबळजनक विधान
बेअरस्टोसोबत कन्फ्युजन, तरीही हवेत झेप घेत हॅरी ब्रूकने पकडला सुपरमॅन कॅच, तुम्ही पाहिला का?