Rafael nadal Out from French Open 2024 : लाल मातीचा बादशाह अशी जगभर ओळख असलेल्या राफेल नदाल बद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. राफेल नदाल हा फ्रेंच ओपन 2024 स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत गारद झाला आहे. अॅलेक्झँडर झ्वेरेव्ह याने त्याला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का दिल्याने नदाल फ्रेंच ओपन स्पर्धेतून बाहेर गेला आहे.
फ्रेंच ओपन स्पर्धा ही टेनिस विश्वातील मानाची स्पर्धा समजली जाते. परंतू यंदाच्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत विजयाचा प्रमुख दावेदार समजला जाणारा राफेल नदाल पराभूत झाला आणि थेट स्पर्धेतूनही बाहेर गेला. नदालला अॅलेक्झँडर झ्वेरेव्ह याने पहिल्या फेरीत पराभवाचे पाणी पाजले. ( Big News Rafael nadal Out from French Open 2024 )
फ्रेंच ओपन 2024 च्या पहिल्या फेरीत यंदा इतिहास घडला. 14 वेळेसचा चॅम्पियन राफेल नदाल स्पर्धेतून बाहेर पडला आहे. अलेक्झांडर झ्वेरेव्हनं 3- 6, 6- 7, 3- 6 ने नदालचा पराभव केला. राफेल नदालचा हा शेवटचा सामना असल्याचीही चर्चा होत आहे. महत्वाचे म्हणजे नदाल सोबत भारतीय खेळाडू सुमित नागलचाही पराभव झाला आहे आणि तोही स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
करिअरमध्ये राफेल नदालला प्रथमच सलग दोन पराभवास सामोरे जावे लागले. फ्रेंच ओपनच्या इतिहासात पहिल्यांदा चाैथ्या फेरीच्या आधीच तो बाहेर पडला आहे. फ्रेंच ओपनमध्ये याअधी 2010 मध्ये राॅबिन सोडरलिंग आणि 2015 व 2021 साली नोवाक जोकोविच कडून राफेल नदालचा पराभव झाला होता. करिअरचा शेवटचा सामना समजल्या जाणाऱ्या राफेल नदालला मैदानावरील 15000 चाहत्यांनी टाळ्या वाजवून अभिवादन केले.
End of an era? Rafel Nadal out at Roland Garros
Change of topic but today the unofficial king of roland Garros, Rafael Nadal, lost in the first round to Alexander Zverev in 6-3, 7-6(5), 6-3.
This was supposed to be his final year and he wanted so to shine on his beloved gravel… pic.twitter.com/wtgXuNS0BQ
— Brian BJ (@iamBrianBJ) May 27, 2024